पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, सदस्य मच्छिंद्र हाडे, दामोदर डुबे, डॉ.अंताराम धरपळे, मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या ध्वजाचे शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेची गौरवशाली इतिहास, परंपरा सांगणारी गीते वाजविण्यात आली. शालेय समितीचे सदस्य डॉ.अंताराम धरपळे, अध्यक्ष नंदकुमार वैद्य यांनी शुभेच्छा देऊन संस्था इतिहास या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल लोंढे यांनी तर आभार मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

0 टिप्पण्या