धर्मगुरू पद हे त्यागाचे, सेवेचे प्रतिक आहे- महागुरूस्वामी लुरडस डॅनियल

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : फातिमा माता चर्च राहूरी फॅक्टरी येथे फा.राजेंद्र लोंढे यांचा २५ वा धर्मगुरू पदाचा रौप्यमहोत्सव संपन्न झाला. यावेळी नाशिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी रा.रे.डाॅ.लुडस डॅनियल, पुणे येथील पेपल सेमिनरीचे रेक्टर व निरोप्याचे संपादक फा. भाऊसाहेब संसारे, असंख्य धर्मगुरू व धर्मभगिनी, भाविक उपस्थित होते.

बिशप लुडस डॅनियल यांनी फा‌.राजेद्र लोंढे यांच्या मातापित्यांचे विशेष आभार मानले. नाशिक धर्मप्रांतासाठी धर्मगुरूंची नितांत गरज आहे. धर्मप्रांतीय धर्मगुरू फार थोडे आहेत. काही मिशनस्थानात खेडी भरपूर आहे. तेथे धर्मगुरूंची नितांत गरज आहे. भाविकांनी आपलं कुटुंबातील एकजण मिशन कार्यासाठी, धर्मगुरू होण्यासाठी पाठविण्याचे आवाहन केले. फा.भाऊसाहेब संसारे यांनी फा.राजेंद्र लोंढे विषयी गौरव उदगार काढून समर्पित जीवनाविषयी सांगितले. फा.राजेंद्र लोंढे हे सेमिनरीत असतांना त्यांचे रेक्टर बिशप लुडस डॅनियल होते. बिशपांनी फा.राजेंद्र लोंढे यांचे सेमिनरीतील जीवन कार्य सांगितले.

प.मिस्सा झाल्यानंतर बिशप स्वामी व फा.भाऊसाहेब संसारे यांचा पुणेरी पगडी, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. राहता येथील लेखक अनिल धिवर यांनी स्मरणिकेविषयी माहिती दिली. प्रकाश किरण प्रतिष्ठान श्रीरामपूर च्या वतीने फा.राजेंद्र लोंढे यांना मानपत्र देण्यात आले. मानपत्राचे वाचन संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी केले. मानपत्र, शाल फा.राजेंद्र लोंढे यांना प्रतिष्ठान चे लेविन भोसले, विजया भोसले, महागुरूस्वामी लुडस डॅनियल, फा.भाऊसाहेब संसारे यांचे हस्ते देण्यात आले.
सदर प्रसंगी सेवेसाठी समर्पित या स्मरणिकेचे प्रकाशन बिशप लुडस डॅनियल, फा.भाऊसाहेब संसारे, फा.राजेंद्र लोंढे, फा.विलास सोनवणे, फा.जेकब गायकवाड, फा.शेळके, लेविन भोसले, अनिल धिवर यांनी केले. मिस्से अगोदर मुलींनी इशस्तवनाने स्वागत केले. राहता येथील गायकवृदांनी सुमधुर गितानी मिस्सेत गोडवा निर्माण केला. प्रास्ताविक फा.राजेद्र यांचे बंधू यांनी केले तर आभार फा.राजेद्र लोंढे यांनी मानले. यावेळी केक कापून फादरांना शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी यांचे शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.

या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सुत्रसंचा लन फा.विलास सोनवणे यांनी अतिशय सुंदर केले. शेवटी सर्वांना प्रिती भोजन देण्यात आले ‌यावेळी फा. राजेद्र लोंढे यांचा सत्कार अनेक व्यक्ती, संस्था,संघटना, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईक यांनी केला. हा सत्कार सोहळा बरेच वेळा चालला. फा.राजेद्र लोंढे यांनी स्मरणिका संपादकीय मंडळातील सदस्य फा‌.आनंद बोधक, फा.संजय पठारे, अनिल धिवर, लेविन भोसले, पी.एस.निकम, राजेंद्र भोसले यांचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या