सेवापूर्तीनंतर विद्यार्थ्यांसाठी योगदान द्यावे- अनुराधा आदिक

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : माझे वडील स्व. गोविंदराव आदिक यांनी मला घडवले. त्यामुळे श्रीरामपूर नगराध्यक्षा, तसेच साई संस्थान शिर्डी येथे मला एकमेव महिलेला विश्वस्तपद मिळाले. त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. आदिक साहेबांनी शाळा काढल्या. त्यापैकी एक शिरसगाव आहे. स्व.जी के पाटील यांनी त्यावेळी सहकार्य केले.

आज शिरसगाव विद्यालयाचे प्राचार्य जयकर मगर व पर्यवेक्षक क्रीडाशिक्षक भास्करराव ताके हे जरी नियमाने सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी सेवानिवृत्ती नंतर विद्यार्थ्यांसाठी आपले योगदान सुरूच ठेवावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी अनेक शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे. शाळेचे नाव राज्य, जिल्हा, देशपातळीवर नेले आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळ्यात केले.

प्राचार्य मगर व ताके या सेवापूर्ती सत्कारमूर्ती यांचा सपत्नीक माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जयंतराव चौधरी यांच्या हस्ते मानपत्र, शाल, बुके आदी देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन एस बी शिंदे व संगीता घोडे यांनी केले. त्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाण्याचा जलकुंभ भास्करराव ताके यांनी उभारणेचा मनोदय केला. त्याचा शुभारंभ माजी प्राचार्य रावसाहेब आदिक यांच्या हस्ते झाला. तसेच कार्यक्रमाचे स्टेजसाठी सभामंडप देण्याचा मनोदय केला. त्याचा शुभारंभ श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन गणेशराव मुदगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रीती चांदगुडे, आकांक्षा चव्हाण, पूजा यादव या विद्यार्थ्यांनी व गणेशराव मुद्गुले, आबासाहेब गवारे, जयंतराव चौधरी, किशोर पाटील, अध्यक्ष सोपानराव गवारे, विधिज्ञ उऱ्हे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक विजय थोरात यांनी व सूत्र संचालन अरविंद थोरात यांनी केले. सत्कारमूर्ती जयकर मगर, भास्करराव ताके यांनी आपल्या सेवा काळात झालेल्या कार्याचा आढावा दिला व सर्वांनी सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

समारंभास माजी सहसचिव शहाराम शेटे, गव्ह.कौन्सिल सदस्य सुनील थोरात, हंसराज आदिक, आदित्य आदिक, विमल पटारे, रावसाहेब आदिक, साईनाथ गवारे, भागचंद औताडे, मंजाबापू थोरात, उपसरपंच श्रीमती जाधव, त्याच प्रमाणे मगर व ताके यांचे स्नेही, नातेवाईक, सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका, कर्मचारी, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन राजन वधवाणी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या