लोणी खुर्द मधील ग्रामदैवत विरभद्र यात्रा उत्सव धुमधडाक्यात संपन्न

काठीचे दर्शन करताना कृषीभुषण प्रभाताई घोगरे समवेत सरपंच जनार्दन घोगरे.

लोणी खुर्द : सालाबाद प्रमाणे भुमिपुत्र स्वर्गीय आमदार चंद्रभान दादा घोगरे पाटील यांनी जपलेल्या परंपरेनुसार वर्षानुवर्ष सुरु असलेला ग्रामदैवत विरभद्र यात्रा उत्सवात गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमचं लोणी खुर्द चे ग्रामदैवत श्री विरभद्र महाराज यात्रा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

दि. २४ तारखेला सकाळी ७.०० वा गंगेच्या पाण्याची गावातुन मिरवणूक काढण्यात आली. तद्नंतर ७.३० वा गावातील सर्वधर्मीय समाज बांधव यांच्या शुभहस्ते श्री विरभद्र महाराजांची विधिवत आभिषेक पूजा धर्माधीकारी गुरु यांच्या मंत्रघोषात करण्यात आली. तर सायंकाळी ५.०० वा गावातील काठीचे मानकरी असलेले आहेर कुटुंब यांच्या जुन्या वाड्यापासून पारंपरिक रुढी परंपरा सांभाळून लोणी गावाचे जेष्ठ मार्गदर्शक एकनाथराव घोगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचे सरपंच जनार्दन घोगरे व मानकरी कुटुंबातील सदस्य नथुराम आहेर सर यांच्या शुभहस्ते काठीचे विधिवत पुजन करण्यात आले. त्यानंतर मुळ जुन्या गावातील जुन्या मार्गाने काठीची भव्य महामिरवणुक करण्यात आली. दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. २५ तारखेला लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर प्रस्तुत नटरंगी नार चा सुरेख कार्यक्रम रात्री १० ते २ वाजेपर्यंत करण्यात आला. पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ व भाविकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. विशेषतः महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

यात्रेच्या निमित्ताने मोठमोठी रहाड गाडगे, पाळणे, लहान मुलांचे खेळ, करमणुकीचे वेगवेगळी उपक्रमे, आकर्षक विद्युत रोषणाई तसेज हालवाई चे दुकाने, लेडिज गारमेंटस, मेकप मटेरियल, किड्स वेअर छोटी मोठी दुकाने, लहान मुलांची खेळणी ची दुकाने यांनी यात्रेची शोभा वाढवली. कोरोनोच्या महामारी नंतर लोणी खुर्द गावात अनेक वर्षानंतर एवढी मोठी विरभद्र यात्रा गावात भरल्याने गावातील ग्रामस्थांकडून विरभद्र यात्रा कमिटी व सरपंच जनार्दन घोगरे यांचे कौतुक केले जात आहे.

संपुर्ण गाव व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवली. विषेशतः ऐवढा मोठा रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम व हजारो भाविकांचा सहभाग असुन ही कार्यक्रम विना पोलीस बंदोबस्तात झाला याचे खुप समाधान आहे.
_ श्री जनार्दन घोगरे; सरपंच ग्रामपंचायत लोणी खुर्द.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या