![]() |
| बिडकीन (ता.पैठण) येथे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आनंदेश्वरी मोटर्सचे उद्घाटन करताना सोबत उपतालुकाप्रमुख मनोज पेरे, राजेंद्र तांबे, विजय शेजुळ आदी. |
◾कॅबिनेट मंत्री भुमरे यांचे प्रतिपादन
विलास लाटे/ढोरकीन : धावत्या युगामध्ये प्रत्येकांना वाहनाचा मोह आवरत नाही. दिवसेंदिवस पेट्रोलियम पदार्थाचे रोजच भाववाढ होत असल्यामुळे पेट्रोल, डिजेलवर चालणारी वाहने सध्यातरी परवडत नाही. यावर पर्याय म्हणून प्रदुषण विरहित पर्यावरण पुरक विना पेट्रोलची ईलेक्ट्रीक वाहने वापरणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रोहयो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी नुकतेच बिडकीन येथे आनंदेश्वरी मोटार्स शोरुमच्या शुभारंभप्रसंगी केले.
याप्रसंगी रोजगार हमी व फलोत्पादन मंञी संदीपान भुमरे, नाथ संस्थान विश्वस्त विठ्ठलशास्ञी चनघटे, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज पेरे, स्वराज्य नागरी पतसंस्था अध्यक्ष सर्जेराव जाधव, सरपंच विष्णू जाधव यांच्या प्रमूख उपस्थितीसह राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे, भाजपा नेते तथा माजी सभापती डॉ. सुनिल शिंदे, जि.प.सदस्य तथा माजी सभापती विजय चव्हाण, पं.स. सदस्य लतिफ कुरेशी, माजी सरपंच अशोक धर्मे, उद्योजक अशपाक सय्यद, पोलिस निरिक्षक संतोष माने, तहसिलदार सारंग चव्हाण, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब टेके, सचिन हाडे, प्रविण चव्हाण, रावसाहेब हाडे, किरण गुजर, मधुकर सोकटकर, प्रकाश लबडे, भिमराज टेके, मोहन गवारे, डॉ.ञिंबक पाडळकर, दिलीप देवळाणकर, विकास गोर्डे, कृष्णा चव्हाण, कृष्णा गिधाने, शरद लघाने, पुंडलीक जाधव, विठ्ठल मोगल, किरण काळे, अशोक शहाराव, प्रा.युसुफ पठाण, सिताराम आव्हाड, पांडुरंग गरड, राजेश भोसले, अशिष जगताप, प्रदीप चव्हाण, नंदु खोतकर, उमेश तिवाडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर औटी यांनी आनंदेश्वरी मोटर्सचे राजाभाऊ शेजुळ यांनी प्रस्तावना मांडली तर संजय शेजुळ, विजय शेजुळ, अरविंद शेजुळ, मनोज पेरे यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या