साइडपट्ट्या न भरल्याने रस्त्यांची दुरावस्था; लोकप्रतिनिधीसह अधिकार्यांचे ठेकेदारांकडे दुर्लक्ष

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : तालुक्यात सध्या ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरणाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा साईट पट्ट्या न भरल्याने नवीन रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. लोकप्रतिनिधीसह अधिकार्यांनी ठेकेदारांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशा निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असुन लोकप्रतिनिधीसह अधिकार्यांनी रस्त्याचे कामे घेतलेल्या ठेकेदारांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण ते पाथरे रस्त्याचे अंदाजे दोन किलोमीटरचे डांबरीकरण व खडीकरणाचे काम दोन टप्प्यांत झाले आहे. ना. प्राजक्त तनपुरे यांनी विशेष प्रयत्न करून वळण ते पाथरे शिवापर्यंत रस्त्याला निधी दिला. रस्त्याचे काम झाले, ठेकेदाराने दोन किलोमीटर रस्त्याचे काम करून रस्ता पूर्ण केला. परंतु साईट पट्ट्या न भरल्यामुळे रस्ता लगेच खराब झाला आहे. 

नुकताच बनविलेला रस्त्याची दुरावस्था सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असुन रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सुधारण्याची प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव, अजितराव जाधव, सुदामराव शेळके, रोहिदास आढाव, युवासेना राहुरी तालुका उपाध्यक्ष धनंजय आढाव, रुषिकेश आढाव, प्रकाश खुळे, वसंतराव आढाव आदींसह ग्रामस्थांनी मागणी केली आहे. 
       तालुक्यातील नवीन सर्वच रस्त्यांना साइट पट्ट्याच दिसत नसल्याने या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनही येणाऱ्या काळात रस्त्यांची दुरावस्था होणार आहे. यामुळे अशा रस्त्याबाबत कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. लोकप्रतिनिधीसह अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या