विजय चिडे/पाचोड : जेवढी विकासकामे २५ वर्षात झाली नाहीत तेवढी ३० महिन्यात झाली. २५ वर्षात ते पैठण तालुक्यातमध्ये गेले, आमदार म्हणून जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढी विकासकामे या ३० महिन्यांत रोहयो मंत्री झाल्यानंतर केली. पैठण तालुक्यातील मुरमा येथे ३५ लाखांचे हनुमान मंदिर तसेच जमिनीचा विकास झाला आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पैठण कृषी उत्तन बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, नंदुलाल काळे, अंबादास नरवडे, सुभाष चवरे, भाऊसाहेब गोजरे, शिवराज भुमरे, जिजाभाऊ भुमरे, कमलाकर एडके आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्रिपदावर विराजमान आहे. शिवसेनेच्या सरकारमध्ये ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रोजगार हमी विभागाचे मंत्रीपदही मला मिळाले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यामुळेच मी तालुक्याच्या प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकास कामे झाले असून त्यात गावातील रस्ते, ड्रेनेज लाईन, फळबाग योजना, मोहगणी शेती, द्राक्षे, शेवगा अजगर यांचा समावेश आहे. अन्न, मातोश्री पाणंद मोहीम सोबत १०२ गावांना पाण्यासाठी ग्रिड मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घरात शुद्ध पाणी, तसेच सुप्रो मा योजनेच्या माध्यमातून मुरमा कोळी मंडळ, हरगाव, पाचोड, केकत, जळगाव, इ. शेतीसाठी दिली आहे. यावेळी शुभम पिवळ, किशोर चौधरी, जयकुमार बाकलीवाल, अक्षय जायभाये, बाळू भालसिंगे,नंदलाल पठाडे,ज्ञानेश्वर कापसे,शिवाजी काकडे, शाम तांगडे, सिद्धेश्वर मगरे, अशोक फसाटे, मुरमा ग्रामपंचायत सरपंच सिंधुबाई दादासाहेब शिंदे, उपसरपंच उषा दिनकर मापारी, सदस्य गणेश नेमाने, बाबरे, गोपीचंद आहेर, रमेश चिडे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ऊस पूर्ण तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवणार
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील रेणुका देवी शरद साखर कारखाना परिसरातील काही शेतकऱ्यांचे अद्याप ऊस गाळप बाकी आहे. या कारखान्याच्या क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतात झाले आहे. मात्र शेतकरी बांधवांनी काळजी करण्याची गरज नाही. जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस गाळप होणार नाही. तोपर्यंत कारखाना सुरूच राहील.

0 टिप्पण्या