राहुरी शहर/ अशोक मंडलिक : आज राहुरी येथे " एक तास राष्ट्रवादीसाठी " या उपक्रमास माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या समस्या त्वरित दूर होण्यासाठी अधिक प्रयत्नशील रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी केले.
नागरिकांच्या तक्रारीचे निवारण त्वरित होण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहावे असा सल्ला त्यांनी दिला. पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी फोनद्वारे अडचण सांगितली तरी तीही प्राधान्य क्रमाने घेऊन मार्ग काढावा असेही तनपुरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या आदेशाची पूर्णपणे काटेकोर अंमलबजावणी करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा. पक्षाची ध्येयधोरणे विविध विकास कामे तळागाळापर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष मोहीम राबवावी. मतदारसंघात विविध कामे झालेली आहेत. जनतेला जागरूकपणे सांगावी असे त्यांनी नमूद केले.
एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यासाठी माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांची प्रमुख उपस्थितीत होती. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी असा उपक्रम करण्याचे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. त्यानुसार आज उपक्रमास प्रारंभ झाला. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक कसोशीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी, अंबादास ढमाळ यांचे मार्गदर्शन झाले.
यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदाताई खुळे, शहराध्यक्ष अपर्णाताई धुमाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके, मा. उपसभापती प्रदीप पवार, माजी सभापती सुरेश निमसे, माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे, शहाजी जाधव, प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, नंदकुमार तनपुरे, संजय साळवे, अंबादास डमाळे, दशरथ पोपळघट, गणेश घाडगे, अशोक गाडेकर, विष्णू घोरपडे, ज्ञानेश्वर घोरपडे, गोरक्षनाथ रणसिंग, पोपटराव रणसिंग उपस्थित होते.
0 टिप्पण्या