हर्षदा शेळके सहाय्यक अभियंता पदी उत्तीर्ण


विजय चिडे/पाचोड
: हर्षदा एकनाथ शेळके हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग इंजीनियरिंग परीक्षा सहाय्यक अभियंता प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण केल्यामुळे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

   हर्षदाचे उच्च शिक्षण एमजीएम कॉलेज, औरंगाबाद येथे अभियांत्रिकी विभागात झाले असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र पब्लिक स्कूल औरंगाबाद येथे झालेले आहे. हर्षदा ही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असूनही लहानपणा पासूनच हर्षदाला अभ्यासाची आवड असल्याने तीने शालेय शिक्षणात, महाविद्यालयीन शिक्षणात अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. हर्षदाची अत्यंत सुसंस्कृत आणि सुशील कुटुंबात वाढ झाल्यामुळे आणि घरातूनच स्पर्धात्मक परीक्षांचे बळ मिळाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा हर्षदाने निर्णय घेतला. 

   अभियांत्रिकी सेवा परीक्षा ही तशी अवघड मानली जाणारी परीक्षा आहे. परंतु हर्षदाने पहिल्याच प्रयत्नात या परिक्षेत यश प्राप्त केले आहे. या परिक्षेत यशस्वी होण्यासाठी तीने सलग दोन वर्ष आहोरात्र स्वतःला पुस्तकांत झोकून दिले होते. गत दोन वर्ष कोरोणाने देशभरात हाहाकार माजवला होता. त्यामुळे सर्वत्र शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाले. त्यामुळे कोणाचे मार्गदर्शन भेटणेही मुश्किल जात असे, मात्र स्वःताला सिध्द करण्याची जिद्द हर्षदामध्ये होती. तीने कोरोणा आणि लाँकडाऊन मध्ये फक्त आणि फक्त आभ्यास पुस्तकांची सांगड जुळून घेतली लाँकडाऊन मुळे तीला अभ्यासाला उत्तम वेळ मिळाला. या संधीचे तिने सोने केले असल्याचे हर्षदाच्या आई वडील सांगतात. हर्षदाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग इंजीनियरिंग परीक्षा सहाय्यक अभियंता प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण केल्यामूळे तिच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील, काका काकू, सर्व प्राध्यापकवृंद, शालेय शिक्षक, सर्व कुटुंबीय आणि मैत्रिणींना देत असल्याचे हर्षदाने सांगितले आहे. 


हर्षदाच्या आईने तिच्या यशाचे कौतुक करतांना म्हटले आहे की, हर्षदाने कधीही वेळेचा अपव्यय केला नाही. सतत अभ्यासामुळे तिला दोनदा दवाखान्यात भरती सुद्धा करावे लागले होते. आम्ही तिला अभ्यासाचा इतका तणाव घेऊ नको असं सतत सांगत असू तथापि आजचे तिचे हे यश पाहून खूप आनंद होत असल्याचे हर्षदाच्या आईने सांगितले आहेत.


हर्षदाचे वडील एकनाथ शेळके सार्वजनिक बांधकाम विभागातून अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.आपल्या मुलीने स्पर्धात्मक परीक्षा देऊन कुटुंबाचे नाव उज्वल करावे अशी त्यांची नेहमीच इच्छा असायची.त्यांनीही हर्षदाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून ती लवकरच मोठ्या पदावर जाईल अशी खात्री व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या