तहसीलदार शेळके यांची पैठण तहसील कार्यालयात पुनर्नियुक्ती करा


मनसे व स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे मागणी

◾नसता उपोषणाचा इशारा

विलास लाटे/ढोरकीन : गेल्यावर्षी एका लाच प्रकरणात तत्कालीन तहसिलदार चंद्रकात शेळके यांच्याकडील तहसिलदारपद काढुन घेण्यात आले होते. याप्रकरणी चौकशीनंतर महसुल वनविभागाने त्यांना या लाच प्रकरणातुन क्लिनचिट दिली असून त्यांची इतरत्र नियुक्ती न करता त्यांची पुन्हा पैठण तहसील कार्यालयात पुनर्नियुक्ती करावी अशी मागणी सोमवारी (दि.११) मनसेचे तालुका उपप्रमुख नवनाथ चौधरी व स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

     तहसीलदार शेळके यांच्यावर सुडभावनेतुन काहींनी खोटे गुन्हे दाखल करुन न केलेल्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला होता. मात्र, याप्रकरणी झालेल्या चौकशीत महसूल वनविभागाने शेळके यांना लाच प्रकरणात क्लिनचीट देण्यात आली असून उच्च न्यायालयातही त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यांना निलंबित न करता अन्य विभागात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाला पैठण तालुक्यात काही पक्ष व संघटनांनी विरोध करत शेळके यांची पैठण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व लोकहिताचे निर्णय घेणारे अधिकारी म्हणून एक चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी तसेच पुनर्नियुक्तीसाठी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, सामाजिक संघटना तसेच अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदने दिली आहेत. हे त्यांच्या चांगल्या कार्याचे दाखले असून या सर्वांच्या भावनेची कदर करुन त्यांची इतरत्र कुठेही नियुक्ती न करता पुन्हा पैठण तहसील कार्यालयात पुनर्नियुक्ती करावी असे मनसेचे तालुका उपप्रमुख नवनाथ चौधरी व स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे यांनी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनपत्रात म्हटले आहे. या मागणीची त्वरित दखल घेण्यात यावी. नसता दि.२८ एप्रिल पासून तालुक्यातील नागरीकांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या