टाकळी येथील जि.प.शाळेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी


विलास लाटे/ढोरकीन : पैठण तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.११) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा ज्येतिबा फुले यांच्या जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. महात्मा ज्येतिबा फुले यांचे जीवन कार्य, त्यांचे योगदान, शिक्षणाविषयी त्यांचे कार्य, आजच्या पिढीला त्यांच्या विचारांची गरज आदी माहीती विद्यार्थांनी भाषणातून दिली.

या प्रसंगी संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक विजय गोरे हे अध्यक्ष म्हणून लाभले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवनाथ जाधव, सरपंच महेश सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, उपसरपंच अप्पासाहेब जाधव, शेषराव सोलाटे, उमेश सोलाटे, अजय भालेकर, गोरख जाधव, हभप वैष्णवी महाराज जाधव आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी हभप वैष्णवी जाधव व कडुबाळ सुसे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण विजय गोरे यांनी केले. गावातील सर्व तरूण मंडळाने शाळेतील सर्व विद्यार्थांना वही व पेन वाटप केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक हेमराज देशभ्रतार, अंजली पांडे, अंगणवाडी कार्यकर्त्या कविता राजाळे यांनी मेहनत घेतली. सुत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या