वरवंडी येथे महामानव डॉ आंबेडकर व क्रांतीसुर्य फुले यांची सायुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अहमदनगर/ जावेद शेख : बहुजन विकास कृती समिती वरवंडीच्या वतीने वरवंडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले या महा मानवांची सायुक्तीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री नऊ ते बारा या वेळेत भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

१४ एप्रिल रोजी सकाळी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब भिमराव आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले सह सर्व महापुरुषांना गावातील महीलांच्या हातुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बौधाचार्य संजय संसारे यांनी त्रिसरण पंचशीला पठण केल्या. सुनिल भालेराव यांनी बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतीज्ञाचे वाचन केले. लहान मुलांची गिते, भाषणे सादर करण्यात आली. त्याच बरोबर वरवंडी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सलीम शेख व गावचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, दिपक बर्डे यांनी ग्रामस्थांना भिम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते फिरोज रशिद शेख, जेष्ठ पत्रकार आर आर जाधव यांनी प्रबोधन पर मनोगते व्यक्त केली. जगदीश भालेराव, यांचे अध्यक्ष भाषण झाले. कोरोना मध्ये मृत झालेल्या व्यक्तीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामस्थांना मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या जयंती उत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसुन आला. सांयकाळी सहा ते दहा या वेळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमाची भव्य अशी सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी सलीम शेख, पत्रकार सचिन पवार, पत्रकार जावेद शेख, दिगंबर ताकटे, बाबासाहेब त्रिंबक अडसुरे, सुरेश भुजाडी, प्रविण लोखंडे, संदिप बरे, मुक्ताजी ऐनर, मधुभाऊ भालेराव, मिराताई ओहळ, उपसरपंच शकुंतला पवार, विश्वनाथ पवार, राजेंद्र पवार, सुनिल पवार, शिवाजी माने, इस्माईल शेख, फैरोज शेख, दिपक बर्डे, पप्पु भालेराव, हारूण शेख, राजु मगर, मच्छिंद्र मगर, राजु पवार, शिवाजी माने, संभाजी गर्दे, नंदु भालेराव, शिरपत पवार, बाबासाहेब जगन्नाथ अडसुरे, संजय अडसुरे, जमीर शेख मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी महिलांची ही मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती. हा कार्यकम यशस्वी होण्यासाठी सुनिल रावसाहेब भालेराव, रविंद्र भालेराव, बबलु भालेराव, राजु मगर, आब्बा भालेराव, मच्छिंद्र मगर, रघुनाथ पवार, सतीष आढाव, पिंटु भालेराव, देवजी भालेराव, गणेश पवार, अभिषेक शिंदे, चेतन पवार, ऋषीकेश भालेराव, सतीष भालेराव, रमेश भालेराव, नारायण शिंदे, गोरक्षनाथ भालेराव, बिटु पवार, सागर जावळे, सचिन भालेराव, अक्षय भालेराव, कैलास पवार, बंडु भालेराव, गणेश शिंदे, चैतन्य शिंदे, रमेश भालेराव, संतोष भालेराव, सागर पवार, शुभम पवार, पप्पु रावसाहेब भालेराव आदिंसह बहुजन विकास कृती समितीच्या सर्वच सदस्यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे अक्षय भालेराव यांनी प्रास्तावीक केले. सूत्रसंचालन शंकर भालेराव यांनी केले तर बबलु भालेराव यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या