श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्येय फौंडेशन श्रीरामपूर यांच्या वतीने व मराठा युवा प्रतिष्ठान, शंभूराजे मित्र मंडळ, स्वराज्य वेलफेअर सोसायटी यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर ”शिवबा हॉल” थत्ते मैदानसमोर श्रीरामपूर येथे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ध्येय फौंडेशन अध्यक्ष राजदीपसिंह जाधव यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व माणुसकीची उंची वाढविण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष आहे. नाव नोंदणीसाठी ईश्वर चव्हाण मो. क्र. ९१४६२९१६३६ वर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष राजदीपसिंह जाधव, उपाध्यक्ष गौरव मालोदे, सचिव योगेश मरकड, सहसचिव योगेश कानडे आदींनी केले आहे.
0 टिप्पण्या