मांजरी / प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी कोरणा महामरीमुळे खंडित असलेल्या चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मांजरी पानेगाव गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला सुरू होतो आणि तीन दिवस चालू असतो.
यात्रेच्या दिवशी पहाटे गंगा नदीवरून आणलेल्या कावडीने नवयुवक जलाभिषेक करतात. जलाभिषेकचा पहिला मान गावातील तेली समाजाला असून आंबील आरतीचा मान पानेगाव चे जंगले यांना आहे. पूर्वीची आख्यायिका अशी आहे की, मुळा नदीच्या काठावर चंद्रगिरी महाराज भक्ताच्या स्वप्नात जाऊन बोलले की मी नदीच्या काठावर आहे, मामा भाचांची बैलजोडीत मला इथून घेऊन जा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेला चंद्रगिरी महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मांजरी या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो.
यात्रेच्या दिवशी जिल्ह्यातून तसेच अनेक ठिकाणाहून नवसपूर्तीसाठी भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसते. नवसपूर्तीसाठी येथे शेरणी गुळाची वाटप केली जात असते. यात्रेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी रथावरून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या वेळेस पानेगाव मांजरी या दोन्ही गावच्या बाजूने मुळा नदी तटावर फटाक्यांची आतिषबाजी पाहावयास मिळते. आतिषबाजी पाहण्यासाठी येथील परिसरातील लाखो भाविक येथे जमा होत असतात.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा तसेच बैलगाड्यांच्या शर्यती येथे साजरी करण्यात येतात. कुस्त्यांच्या हांगाम्यासाठी जिल्ह्यातून तसेच राज्यातून नामवंत मल्ल येथे येत असतात. तसेच बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी ही राज्यातून टांगेवाली येत असतात. तिसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीच्या शेवटच्या दिवशी खरेदीसाठी गर्दी झालेली असते. यावेळी पोलिस तसेच गावातील यात्रा कमिटीकडून महिलांना तसेच इतरांना कुणाला त्रास होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी घेतली जाते.
मांजरी पानेगाव या दोन्ही गावांमध्ये कुठल्याही प्रकारे छत्री तसेच दुमजली इमारत तसेच पलंग गादीचा वापर केला जात नाही. या गोष्टी चंद्रगिरी महाराजांना चालत नाही. श्रद्धेपोटी गावांमध्ये वरील गोष्टींचा वापर केला जात नाही.
0 टिप्पण्या