नांदलगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने मार्गदर्शन


विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यातील नांदलगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे तर्फे गावातील मंदिर व मशिदीची साफसफाई करून सायंकाळी आहार, विचार व जिवन जगण्याची कला या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग युथचे सहर्ष दामेकर, आनंत, तेजस, गौरी अभय यांनी गावातील तरूणांना मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत चाबुकस्वार, शिवाजी शिंदे, नवनाथ गिर्जे , उपसरपंच किशोर शिंदे, किरन लंभाडे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष साईनाथ लंभाडे, साहिल सय्यद, कृष्णा लंभाडे, योगिराज लंभाडे, रामेश्वर चित्रे, सुरेश नरवडे, शकील सय्यद, अनिस सय्यद, शंकर सिरसाठ, सुनिल नन्नवरेसह गावातील महिला, नागरीक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या