श्रीराम नवमी यात्रा उत्सवात विक्रमी गर्दी; दहिगाव पुण्यनगरीत श्री राम नवमी सप्ताह संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : तालुक्यातील दहिगाव येथे श्रीराम देवस्थान आहे. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते. परंतु या दोन वर्षांभर कोरोना महामारी संकटामुळे यात्रा उत्सव भरवता आला नाही. गुढीपाडवा म्हणजेच‌ हिंदू नव वर्षांपासून श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त हरिनाम भजन, किर्तन, हरीनाम श्रवणाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. आज श्री राम नवमी यात्रा उत्सव असल्याने जिल्हा भरातुन भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सकाळी पैठण या ठिकाणावरून कावडी द्वारे जल आणले. नाथ सागरातील जलाने श्रीराम सिता, लक्ष्मण, हनुमानाच्या मुर्तीस जल अभिषेक झाल्यानंतर काल्याचे किर्तन झाले. किर्तन संपल्यानंतर गावातील भावीक भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. गावातील स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करत होते. तदनंतर अनंता द्रवीड यांचे कलाकारांनी धार्मिक गीत गायनाने झाले. यावेळी भावीक भक्त भक्तीमय गिताने मंत्रमुग्ध झाले होते.

श्रीराम मंदिर कळसाचे रंगरंगोटीचे काम झाल्याने भावीक भक्ताने मोठ्या प्रमाणावर सडळ हाताणे देणगी दिली. या देणगीत विशेष देणगी म्हणजे साकत खुर्द गावातील शिवाशं चितळकर( वय वर्ष ७) या छोट्याशा मुलाने जमा केलेला खाऊचा गल्ला श्रीराम मंदिरास देणगी स्वरुपात सुपुर्द केला. डबा उघडला असता त्या डब्यात तब्बल अकराशे पंचाहत्तर रूपये रक्कम मिळुन आली. या निरागस बालाकाची देणगी व देवा प्रती भक्ती रुपी देणगी सर्व भाविक भक्तांना अभिमानास्पद बाब वाटली. या बालगोपालचा माता पुत्राचा देवस्थान मार्फत श्रीफळ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. या नऊ दिवसांच्या कालावधीत अनेक मान्यवरांनी उपस्थितीती लावली. गावातील तरुण दररोज साफसफाई करणे महाप्रसादाचे वाटप नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडत होते. गावातील महिलांनी सामाजिक कार्यात खुप सक्रिय सहभाग नोंदविला. 

श्री राम नवमी यात्रेसाठी दक्ष पोलिस मित्र सामाजिक संघटना, तसेच नगर तालुका पोलिस, होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त तैनात होता. तसेच श्रीराम पब्लिक ट्रस्टचे पाच एकर विस्तारीत क्षेत्रात मंगल कार्यालय जनसेवेत‌ दाखल झाले आहे. यामुळे गोरगरीब मुला मुलींचे विवाह कमी खर्चात संपन्न होणार आहेत आणि येणाऱ्या काळात तिर्थ 'ब" वर्ग साठी देवस्थान प्रयत्नशील आहे असे ट्रस्टचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केले. आजचा यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या