विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील दादेगाव येथील निष्ठावंत शिवसैनिक सुरेद्र गव्हाणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पैठण तालुका सहसमन्वयक पदी निवड करण्यात आली.
या निवडीचे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजूनाना भूमरे, दादासाहेब थेटे, मराठवाडा समन्वयक शिवसेना वैद्यकीय कक्ष रामभाऊ इंगळे, जालना जिल्हा शिवसेना वैद्यकीय कक्ष समन्वयक डी एम गायके, युवा जिल्हाधिकारी किशोर चौधरी, सोसायटी व्हा चेअरमन आबासाहेब हजारे, दादेगावचे सरपंच अनिल हजारे, उपसरपंच सुरेश हजारे, माजी उपसरपंच भाऊसाहेब हजारे, सदस्य महादेव हजारे, उद्धव हजारे, संतोष हजारे, देविदास हजारे, कैलास गव्हाणे, योगेश गव्हाणे,धर्मेंद्र गव्हाणे, महेंद्र गव्हाणे आदीनी शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या