मंळगंगा मंदिर कलषारोहन सोहळा मोठ्या थाटात संपन्न

देवगाव येथे एकाच वेळी दोन मंदिराचे कलषारोहन सोहळा मोठ्या आनंदात संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : नगर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी मोठे ऐतिहासिक मळगंगा मंदिर देवस्थान आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धार काम पुर्ण झाल्याने दि.७ रोजी देवगाव या ठिकाणी या मंदिराचे कलषारोहन सोहळा नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक सोहळा परमपूज्य शेंगदाणे बाबा गडावर सकाळी सात वाजता देवगावचे सरपंच संभाजी वामन यांनी सपत्नीक कलषारोहनची धार्मिक पुजा विधी करून या घाट रस्ता मार्ग वाजता गाजत फटक्यांची आतषबाजी करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत देवीच्या वेशभूषा परिधान केलेल्या सात मुली सहभागी झाल्या होत्या. तसेच इतर मुली महिला कलष तुळस डोक्यावर घेत गावातील कलषारोहन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. घरासमोर मनमोहक रांगोळी काढली होती. तसेच यात वारकरी संप्रदाय मुलं भजन हरीपाठ वाचन करत मिरवणूकीत सहभागी झाले होते. तसेच यात गोंधळी आपल्या वाद्य, वाघ्या, मुरळी सह सहभागी होते. मंदिर कलषारोहन पाच ब्राह्मण मंत्र उच्चारात कलाषारोहन पंच धातु सिंह मुर्ती, कासव ची स्थापन करण्यात आली तसेच मळगंगा मंदिराचे कलषारोहन ह.भ.प.स्वामी हंसानंदपुरीजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देवगाव पंचक्रोशीतील भाविक भक्त या अस्मरणीय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शुभ मुहूर्त प्रसंगी देवगावचे सरपंच संभाजी वामन यांचा वाढदिवस असल्याने विद्यमान आमदार व माजी मंत्री यांनी फेटा व श्रीफळ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व लवकरच मंळगगा देवी मंदिर तिर्थक्षेत्र 'क" वर्गात समावेश करण्यासाठी पाठपुरावा करतील व आम्ही सहकार्य करु असा शब्द यावेळी वेळी दिला. सोमनाथ वामन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले.

यावेळी नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी स्थानिक विकास निधीतून ७‌ लक्ष रुपये निधीचे या म़ंदिर सुशोभीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार बबनराव पाचपुते, तत्कालीन पालकमंत्री असताना ‌आगडगाव देवस्थान तिर्थक्षेत्र विकासात समावेश करण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले प्रस्ताव दाखल करताच तो मंजुर झाला होता. आपल्या भाषणात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला. माजी सभापती विलासराव शिंदे, सरपंच संभाजीराजे वामन, उपसरपंच हरीदास खळे, चेअरमन मच्छिंद्र शिंदे, सदस्य अर्जुन शिंदे, माजी उपसरपंच पंढरिनाथ वामन, अध्यक्ष विजय वामन, माजी सदस्य कुंडलीक वामन, व्हाईस चेअरमन अंकुश वामन, विजय वामन, दिलीप ताटके, अशोकराव देसाडाॅ , माजी सदस्य सुभाष शिंदे, भावी भक्त, देवगाव ग्रामस्थ महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या