अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन...
अहमदनगर (प्रतिनिधी) - धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळा 14 मे रोजी संभाजी राजे यांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत नियोजित ठिकाणी बसवण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास महापालिकेच्या कार्यालयात जागरण गोंधळाचा कार्यक्रम घालण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.
धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळा 14 मे रोजी संभाजी राजे यांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत नियोजित ठिकाणी बसवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोक चव्हाण, महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, अतिक्रमण विभागाचे सुरेश इथापे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी सचिव दत्ता वामन, रावसाहेब काळे, विलास तोडमल, विलास कराळे, विशाल बेरड, सतीश वाघ, विलास काळे, लक्ष्मण ढगे, सुनील सकट, अशोक भोसले, आशा गायकवाड, सविता शिंदे, सुशीला हरिश्चंद्रे, रशिदा सय्यद, रंजनाताई ताठे, मंदा सुपेकर, मीनाक्षी जाधव, सुरेखा कडूस, अरुण ढाकणे, सुनील ठाकरे, बापू ठाणगे, अरंविद जज्जर, मकासरे मॅडम आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळा बसवण्यासाठी यापूर्वी पाठपुरावा केला असून यात शासनाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार मार्गदर्शक नुसार पोलिस यंत्रणा मात करत महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी यापूर्वीच पालिकेने ठराव मंजूर केलेला असून पुतळा बसवायचे काम तात्काळ सुरू करावे. अटी व शर्तीनुसार सर्व पूर्तता झालेली असून 14 मे रोजी धर्मवीर संभाजीराजे यांची जयंती असून या जयंतीच्या दिवसापर्यंत महापालिकेने याच दिवशी पुतळा अनावरण करण्याचा कार्यक्रम ठेवावा व सर्व नगरकर व नगरसेवकांनी पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घेतलेला असून या सर्वांचे मोलाचे योगदान लाभलेे आहे. छावा संघटना या सर्वांचे आभार मानून लवकरात लवकर हा पुतळा बसवावा अन्यथा अहमदनगर महानगरपालिकेच्या कार्यालयात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम घालणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
0 टिप्पण्या