इस्टर दिनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : आपण अनेक संतांचे पुतळे पाहतो. त्यानंतर आपली प्रिय माता मारिया हिच्याकडे सुद्धा आपण वेगवेगळ्या विनंत्या घेऊन जातो. जेंव्हा आपल्याला अत्यंत गरज वाटते तेंव्हा आपल्यासमोर हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे. आपल्याला ज्या विशेष अडचणी असतील त्यावेळी येशूच्या हृदयाकडे आपल्या विनंत्या घेऊन ख्रिस्ताकडे सादर करू शकतो. ही सुविधा इथे झाल्यामुळे फा सुरेश साठे व सह धमर्गुरू यांना धन्यवाद देऊन अभिनंदन करतो, असे प्रतिपादन फा.ज्यो गायकवाड यांनी इस्टर दिनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च प्रांगणात इस्टर सणाचे औचित्य साधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्णाकृती [पुतळा] मूर्तीचे अनावरण श्रीरामपूर रे फा.ज्यो गायकवाड यांच्या हस्ते व हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सर्व धर्मगुरू यांनी यावेळी भाविकांना इस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या. पास्काच्या पहाटे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला मरणावर पापावर दु:खावर सैतानावर त्याने विजय मिळविला, हा पुनरुत्थानाचा विजय आनंद शांती आमच्या प्रत्येकाच्या अंत:करणात नांदू दे. शिष्याप्रमाणे आम्ही तुझी साक्ष इतरांना द्यावी आणि आम्ही ख्रिस्ती बनावे म्हणून आम्हाला कृपाशीर्वाद दे. येशूच्या हृदया आमच्या हृदयावर सदैव राज्य कर व सैतानापासून दूर ठेव आदी प्रार्थना यावेळी करण्यात आल्या.
या आनंदोत्सवात दोन वर्षानंतर कोरोना प्रादुर्भाव नसल्याने हरिगाव चर्चमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या उपवास काळात विविध धार्मिक कार्यक्रम अध्यात्मिक तप, भक्ती, परिसरात भक्ती कार्यक्रम, गुड फ्रायडे दिनी क्रुसाच्या वाटेची भक्ती त्यावेळी गावात देखावे सादर केले, प्रभूच्या दु:ख सहवास विधी, प्रभूचा पुनरुत्थान सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्तविक व आभार ज्यो दिवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या