अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत वाहन कर्ज व कॅश क्रिडीट योजना पुन्हा सुरु करा; अजित पवार यांच्याकडे देवेंद्र लांबे पा. यांची मागणी

राहुरी - अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांना पत्राद्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कॅश क्रिडीट कर्ज व वाहन कर्ज, ट्रक्टर कर्ज व्याज परतवा योजना बंद करण्यात आल्याने मराठा समाजातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या योजना पूर्ववत सुरु करव्यात अशी मागणी श्री. लांबे पा. यांनी पत्राद्वारे केली आली आहे.  

पत्र मध्ये म्हंटले आहे कि, २३ फेब्रुवारी २०२२ रोजीचा अध्यादेश जा.क्र. APM/ADM/६४०/२०२१-२२ व  १६ मार्च २०२२ अध्यादेश O.W.No.APM/ADM/694/2021-22 महामंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्रातील अनेक होतकरू तरुणांनी उद्योग व्यवसाय वाढीसाठी बँकांच्या माध्यमातून मुदत कर्ज तर कॅश क्रिडीट कर्ज घेतलेले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाने कॅश क्रिडीट (CC) कर्ज प्रकरणे बंद केली आहेत. कॅश क्रिडीट कर्ज प्रकरणामध्ये व्यावसायिक तरुण त्यांना पाहिजे तितकेच कर्ज घेवून पुन्हा बँकेत भरत होते. त्यामुळे व्याज देखील कमी लागत होते. व्याज कमी लागल्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाला देखील लाभधारकाला व्याज परतावा कमी करावा लागत होता. परंतु मराठा समाजातील तरुण प्रामाणिक पणे बँकांचे कर्ज भरत असताना देखील कॅश क्रिडीट कर्ज प्रकरणे बंद केल्यामुळे व्यावसायिक तरुण हतबल झालेली आहेत. कृपया आपण महामंडळाच्या माध्यमातून तात्काळ कॅश क्रिडीट योजना पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच नोटा बंदी व करोना रोगाच्या काळातील लॉक डाऊन मुळे तरुणांच्या हाताला काम राहिलेले नाही. मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी वाढलेली आहे. रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मराठा समाजातील तरुण अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मालवाहतूक वाहन खरेदी करून रोजगार मिळवत आहेत. अनेक तरुणांना महामंडळाच्या योजनेमुळे फायदा देखील झालेला आहे. परंतु अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेत अचानक बदल करत मालवाहतूक वाहन कर्ज व्याज परतावा योजना बंद करण्यात आली आहे. तरी आपण मराठा तरुणांचा सहानभूतीपूर्वक विचार करून मालवाहतूक कर्ज व्याजपरतावा योजना पुन्हा चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्राची दखल न घेतल्यास अखिल भारतीय छावा संघटना, मराठा एकीकरण समिती व अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजने पासून वंचित राहिलेल्या लाभधारकांना सोबत घेवून कुठलीही पूर्व कल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या