९ एप्रिल रोजी उन्दिरगाव येथे संचेती संस्थेच्या वतीने मोफत हाडांच्या रुग्णासाठी शिबीर

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : सुप्रसिद्ध संचेती इन्सटीट्युट आर्थोपेडीक्स व रीहाबिलीटेशन पुणे व श्रीरामपूर तालुका कबड्डी लीग स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर परिसरातील गरजू हाडांच्या रुग्णासाठी उन्दिरगाव येथे दि ९ एप्रिल रोजी सकाळी १०-३० वाजता मोफत शिबीर भास्करराव पा.गलांडे विद्यालय उन्दिरगाव ता:श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात सांधेदुखी, संधिवात, सांधे प्रत्यारोपण, कंबर दुखणे, हातापायांना मुंग्या येणे, फ्रोझन शोल्डर, मणक्याचे जुने आजार, डायबेटिक न्युरोपथी, सायटिका पेन, लीन्गामेंट इंज्युरी, टेनिस एल्बो, हिप व नी रिप्लेसमेंट नंतरचे उपचार आदीबाबत मोफत तपासणी, मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांचे होणार आहे.

शिबिरासाठी विलास पंडित मो.क्र ८७१२३११०७४, रवींद्र गाढे ८०१०१२१९०९, अतुल धीवर ८७६७०३३१८८, प्रा.सुनील गाडेकर ७३८७३४६६३० यावर संपर्क साधावा व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या