अहमदनगर शिक्षण उपनिरीक्षक रमेश थोरात यांचा शिक्षक भारती तर्फे सत्कार

शिस्तबद्ध पद्धतीने पटपडताळणी शिबिर सुरू

अहमदनगर/ जावेद शेख : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक महाविद्यालयाची सन २०२०-२०२१ व २०२१-२०२२ या वर्षाचे पटपडताळणी व संचमान्यता शिबीर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणारे नव्याने नियुक्त झालेले जिल्हा परिषद अहमदनगरचे शिक्षण उपनिरीक्षक रमेश थोरात यांचा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व प्रकारचे सहकार्य शिक्षक भारती संघटनेकडून केले जाईल असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे यांनी केले.

याप्रसंगी शेवगाव तालुकाध्यक्ष माफीज इनामदार, न्यू आर्ट्स कॉलेज शेवगाव प्राचार्य डॉक्टर बाणदार, श्री शनेश्वर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सोनवणे डी.आर., दादासाहेब कदम, अंबादास गायकवाड, सुधाकर काळे, आदिनाथ वाढेकर आदी उपस्थित होते. थोरात यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांचे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सरचिटणीस महेश पाडेकर, उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, अमोल वरपे, रूपाली बोरुडे, सचिन लगड, श्याम जगताप, संजय तमनर, सोमनाथ बोनंतले, ज्ञानेश्वर काळे, गोवर्धन रोडे, प्रवीण मते, हर्षल खंडीझोड, संतोष निमसे, संजय पवार आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या