हरिगाव ग्रामपंचायत कारभाराची चौकशी व्हावी- संतोष बनसोडे

श्रीरामपूर [प्रतिनिधी] : तालुक्यातील हरिगाव ग्रामपंचायतीचा कारभार कामकाज तसेच काही कामे टेंडरची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच सुरु होतात. त्यावेळी शासनाचे नियम न पाळता टेंडरची कामे ठराविक ठेकेदारालाच दिली जातात. विचारणा केली तर दखल घेतली जात नाही उलट तेथून बाहेर काढले जाते, अशा प्रकारे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार असल्याची तक्रार हरिगाव येथील संतोष मधुकर बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अहमदनगर, तहसीलदार श्रीरामपूर, गट विकास अधिकारी श्रीरामपूर यांचेकडे केली आहे.

बनसोडे यांनी सांगितले की मंगळवार दि.२९ मार्च रोजी केंद्राचा माहिती अधिकार अर्जाचे अवलोकन सदर करण्याकरिता ग्रामपंचायत हरिगाव कार्यालय येथे गेलो असता माझ्याशी गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले. दि २८ मार्च रोजी नवबौद्ध विकास वस्ती व १४ /१५ वा वित्त आयोग विकास संदर्भात माहिती अधिकार अर्ज सादर केला असता कामकाजाबाबत तफावत, गैरव्यवहार असल्याचे आढळून आले. व माहिती देण्यास टाळाटाळ केली. दारिद्र्य रेषेत नाव समाविष्ट असताना पैशाची मागणी केली जाते. तसेच माहिती अधिकाराची माहिती मिळणार नाही असे सांगून मला धक्काबुक्की करून मला गेटबाहेर हाकलून दिले असे कोणाच्या बाबतीत घडता कामा नये, विकास कामे व छुप्या मार्गांनी टेंडर प्रक्रिया केलेबाबत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्या खडाजंगी सुरु होती. सरपंचबाईना विचारले असता मला काही माहित नाही सांगता येत नाही अशी सरपंच यांची स्थिती आहे. काही कामे टेंडर प्रक्रियेप्रमाणे ठेकेदारानी पूर्ण केली नाहीत. कामाचा कालावधी संपल्याने आलेला निधी शासनास परत करावा लागला. निविदा बाबत नोटीस सूचना लावल्या जात नाहीत. नियमांचे पालन होत नाही. गटविकास अधिकारी यांचेकडे यापूर्वी तक्रार केली पण दखल नाही. सध्या सुरु असलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अशा प्रकारांमुळे माजी आमदार मुरकुटे यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचे दिसते. ते आम्हाला योग्य वाटत नाही. त्याचासुद्धा विचार स्थानिक नेत्यांनी करावा व मा.आ.भानुदास मुरकुटे, व माजी चेअरमन सुरेश पा गलांडे यांनी लक्ष घालून ग्रामपंचायत कारभार सुरळीत, पारदर्शक ठेवण्यासाठी प्रयत्न करावा असे संतोष बनसोडे यांनी सांगितले. लवकरच प्रथेप्रमाणे सरपंच उपसरपंच यांची निवड करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

त्याचप्रमाणे येथील दीपक नवगिरे यांनीही टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाजारतळ कंपाउंड काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यास स्थगिती द्यावी. त्या कामास लेव्हल नाही, लाईन दोरी नाही, कच्च्या सिमेंटचा वापर होताना दिसत आहे. जनावराचा धक्का लागला तरी कंपाउंड पडू शकते, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयच्या निधी वापराची चौकशी व्हावी, या सर्वाची योग्य ती चौकशी वरिष्ठांनी करावी अशी मागणी केली आहे. तसे निवेदन गट विकास अधिकारी यांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या