सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेचा पसाभर धान्य चिमणीसाठी उपक्रम

अहमदनगर/ जावेद शेख : सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी मधील राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत पसाभर धान्य चिमणीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत पाच गोणी धान्य गोळा केले. या उपक्रमात प्राथमिक आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सदर जमा झालेल्या धान्या पैकी एकगोणी धान्य डोंगरगण येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरातील पक्षांसाठी पाठविण्यात आले आहे. राहुरी खुर्द परिसरातील धरमाडीवर मोरांची संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे येथील वन शेत विभागाकडे एक गोणी धान्य मोरांसाठी देण्यात आले आहे. रोज सायंकाळी येथे मोर धान्य खाण्यासाठी येतात. तर दोन गोणी धान्य नगर येथील पक्षी मित्र जयराम सातपुते यांच्या मार्फत मांजर सुंभा आणि भुईकोट किल्ला परिसरात टाकण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील, सभापती डॉ.प्रमोद रसाळ, सचिव डॉ.महानंद माने, खजिनदार महेश घाडगे यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक प्रा.नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक संदेश विसपुते, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब दाते, इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रगुप्त मेहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर अरुण तुपविहिरे, प्रकाश शिंदे, दशरथ दळवी, तुकाराम जाधव, जिंतेद्र मेटकर, शमशुद्दीन इनामदार, संतोष जाधव, रवी हरिश्चद्रे, संगिता नलगे, भक्ती कुलकर्णी, करंडे मँडम आदी शिक्षकांनी सहकार्य केले. हरित सेनेचे सचिव बाळासाहेब डोंगरे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या