राहुरी / बाळकृष्ण भोसले : श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील असलेले २२० के.व्ही. श्रीरामपूर एमआयडीसी अतिउच्च दाबाच्या उपकेंद्राचे काम महापारेषण कडून लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन देत व केलेल्या पाठपुराव्यामुळे महापारेषण कंपनीकडून २२० के.व्ही. श्रीरामपूर एमआयडीसी तील अतिउच्च दाब उपकेंद्राचा प्रस्ताव मंजूर केला असून महापारेषण कंपनीने देखील त्यास सन २०२३-२०२४ अर्थिक वर्षात काम करण्यास मंजुरी दिलेली असल्याचे डॉ. आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने डॉ. नितीन राऊत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सद्यस्थितीत श्रीरामपूर तालूक्यात ९ उपकेंद्र कार्यरत आहे. त्याद्वारे १०० मेगावँट विज मिळते.श्रीरामपूर तालुक्यातील हा प्रामुख्याने व्यापारी शहरी व मोठी औद्योगिक वसाहत असलेला तालुका आहे. हा तालुका संपूर्ण तालूका बागायती असल्याने तसेच उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. त्यामुळे वर्षभर विजपूरवठा आवश्यक असतो. परंतु तालूक्यातील अतिउच्च दाबाचे उपकेंद्र नाही.त्यामुळे ग्राहकांना योग्य दाबाने विज पुरवठा होत नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची अर्थिक नुकसान होत असल्याने वीज ग्राहकामध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात होत आहे.
या महत्त्वाच्या प्रश्नाचा त्वरीत पाठपुरावा करून श्रीरामपूर तालुक्यातील हा प्रश्न मार्गी लावावा या संदर्भात उर्जामंत्री डॉ. राऊत यांचेकडे पाठपुरावा केला असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले.
प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दिपक कदम, प्रकाश भिगांरदिवे, जिल्हा सचिव अनिल भोसले, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष मुस्ताफा इमानदार, किरण घोलप, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब तोरणे, प्रकाश निकाळे, सुभाष तोरणे, प्रमोद अमोलिक, अन्तोन भोसले, सुजन कदम, ऊमेश शेज्वळ, बागुल सर, किरण माळी, सचिन शिंदे, सूरेश पाटिल शिरसाठ, रखमा क्षीरसागर, गोरक्षनाथ अनाप, पाटिल, सोमनाथ शिरसाठ व सर्व बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या