गवताला भाले फुटतात,
तर निवडुंगाच्या फांदीला गुलाब,
मंगळावर वसती येते करता,
कल्पनेच्या विश्वात,
आज्ञाधारक करण्याच्या नादात,
सृजनता, मारून टाकतो आम्ही,
नवनिर्मिती तर कोंडून मारतो आम्ही
नवकल्पना नाव काढू देत नाही,
नोबल पारितोषिके मिळत नाहीत
म्हणून वांझोट्या चर्चा करतो आम्ही,
बाष्फळ गप्पा रंगतात अभ्यासक्रम बदलाच्या,
गावाकडे,
विज्ञान प्रदर्शनात मिळालेल्या उत्तेजनार्थ बक्षिसांचे फ्लेक्स लावतो आम्ही,
तेच माठाचे फ्रीज,
त्याच सायकलवर चालणारे मिक्सर,
टाळी वाजवून लागणारा बल्ब,
आणि हो प्लास्टीक निर्मूलन
तर कळीचा शोधच जनू
स्वायत्तता द्यायचिका?
नाहीतर
तीही
दोरीला बांधलेल्या कोंबडीसारखी
असायची,
थोडक्यात काय,
सब घोडे बारा टक्के,
माझ्या मना दगड बन,
ज्ञानसुत संजय चाकणे
0 टिप्पण्या