श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज मठाधिपती सरला बेट यांच्या अनंत कृपाशीर्वादाने उंदीरगाव ता. श्रीरामपूर येथे दि ७ मे ते १४ मे पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सव हनुमान मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
व्यासपीठ चालक ह.भ.प. माउली महाराज गुंजाळ, रोज पहाटे ४ वा. काकडा भजन, सकाळी ६ वा. विष्णू सहस्त्रनाम, ७ वा. ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ वा. हरिपाठ, रात्री ७ ते ९ वा.हरिकीर्तन, शनिवार ७ मे ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम यांचे कीर्तन, दि ८ ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे, दि ९ ह.भ.प. भरत महाराज जोगी, दि १० धर्मगुरू अमृत आश्रम स्वामी महाराज, दि ११ ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर, दि १२ ह.भ.प. अर्जुन महाराज, दि १३ ह.भ.प. शिवाजी महाराज बावस्कर, दि १४ में रोजी सकाळी १० वा. महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन, व महाप्रसाद होणार आहे.
या पारायण सोहळ्याचा कीर्तन महोत्सवाचा लाभ परिसरातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन समस्त उंदीरगाव ग्रामस्थ, संत गंगागिरी महाराज महिला भजनी मंडळ आदींनी केले आहे.
0 टिप्पण्या