राहुरी शहर/ अशोक मंडलिक : शहराचे ग्रामदैवत असलेले श्री हनुमान मंदिराची यात्रा 16 एप्रिल 2022 रोजी होत असून यात्रेसाठी आज हनुमान यात्रा समितीची बैठक हनुमान मंदिर येथे पार पडली. या यात्रा कमिटीच्या बैठकीत कमिटीच्या अध्यक्षपदी युवा नेते हर्षदादा तनपुरे ह्यांची एकमताने निवड करण्यात आली.
हनुमान यात्रा समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपलघट होते. गेली 2 वर्षपासून कोरोनाच्या महामारीत हनुमान यात्रा भरविण्यात आली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व शासनाने यात्रा भरविण्यास परवानगी दिल्याने दोन वर्षाच्या कालखंडा नंतर 16 एप्रिल 2022 रोजी हनुमान यात्रा भरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी यात्रा समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते हर्षदादा अरुण तनपुरे ह्यांची एकमताने निवड करण्यात आली असून यावेळी पदाधिकारीही निवडण्यात आले. त्यात उपाध्यक्ष पदी अशोक कदम व सचिन राऊत, सचिव पदी अभिजीत घाडगे व अवधूत कुलकर्णी, खजिनदारपदी अनिल कासार व नंदकुमार तनपुरे, सहसचिवपदी संतोष जगधने व संदीप तमनर ह्यांची निवड करण्यात आली.
यावेळी नरेंद्र शिंदे, किशोर भोंगळ, सुरेशराव म्हसे, महेश उदावंत, राजेंद्र बोरकर, संदीप सोनवणे, स्वप्नील भास्कर, दिपक तनपुरे, गणेश घाडगे, मदन तनपुरे, प्रवीण कदम, अमोल रणसिंग, सुभाष तनपुरे, संजय गुलदगड, गौरव तनपुरे, विजय करपे, रवींद्र तनपुरे, बाळासाहेब लगे, प्रकाश तोडमल आदींची कार्यकारिणीत निवड करण्यात आली.
0 टिप्पण्या