बोरावके महाविद्यालयात मराठी लेखन कार्यशाळा संपन्न

श्रीरामपूर : येथील रयत शिक्षण संस्थेचे रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व बोरावके कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने मराठी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी सुप्रसिद्ध कवी, नाट्य दिग्दर्शक तथा पटकथा लेखक अजय घोगरे यांचे पटकथा लेखन या विषयावर तर माझे सुलेखन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला भोर, प्रा. डॉ. संतोष पवार, प्रा. डॉ. बाळासाहेब शेळके, प्रा.डॉ. सुनील चोळके, डॉ. योगिता रांधवणे, प्रा. प्रकाश साबळे व प्रा. गीतल बच्छाव आदींच्या प्रयत्नातून झालेल्या या उपक्रमास ‘पेनलेस’ होत चाललेल्या नवीन पिढीकडून मात्र छान प्रतिसाद लाभला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या