कु.नीलम पोखरकर उच्च शिक्षणासाठी जर्मनीत

अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर येथील ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा उपाध्यक्ष दिनकरराव नानाजी पोखरकर आणि सौ. पुष्पाताई दिनकरराव पोखरकर यांची नात तथा जीवन पोखरकर आणि सौ.मनीषा पोखरकर यांची सुकन्या कु.नीलम पोखरकर हिने बी. ई. मेकॅनिकल पर्यंतचे शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेज अवसरी येथून पूर्ण करून जर्मनीमध्ये एम.एस. च्या उच्च शिक्षणासाठी दि. ७ एप्रिल २०२२ रोजी प्रस्थान करीत आहेे.

त्याबद्दल तीचे अभिनंदन आणि शुभेच्छा देताना माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ, सुखदेव सुकळे, एल.जे. निकम, के. एल. खाडे यांनी कु. नीलम पोखरकर आणि पोखरकर परिवाराचा सत्कार व अभिष्टचिंतन केले. कु.नीलम पोखरकर हिच्या पुढील शिक्षणाला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आणि श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने, प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड, प्रा. डॉ. गुंजाळ, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर प्रा.सौ. सुजाता पोखरकर आदिंनी शुुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

कु.नीलम पोखरकर हिचे प्राथमिक शिक्षण स्व.सौ. साकरबेन करमशीभाई सौमया प्राथमिक विद्यामंदिर येथे, माध्यमिक शिक्षण भि.रा.खटोड कन्या विद्यालय आणि कॉलेज शिक्षण रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयामध्ये झाले. तिच्या जर्मनीतील शिक्षणासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या