जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक उपक्रम आवश्यक - पोलीस उपनिरीक्षक शिंदे

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : सर्व धर्म समभाव ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजविण्याचे काम सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी या प्रकारचे उपक्रम आवश्यक आहे, असे प्रतिपादन राहुरी पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी केले.

राहुरी रेल्वे स्टेशन येथील मस्जिद मध्ये सर्व धर्मियांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जेष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्तविक केले.

याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे युवक नेते किरण कडू, वैभव पेरणे, व्यापारी ईश्वर सुराणा, आमिन पठाण, आयुबखान पठाण, नसीर पठाण, सोहेल पठाण, वाहीद पठाण, फिरोज पठाण, मोहसिन पठाण, मन्सूर पठाण, शेखलाल शेख, अब्बास सय्यद, निसार शेख, शकील पठाण, उस्मान पठाण, जब्बार पठाण, दगडु पठाण, समशेर पठाण, सलीम शेख, मुर्तुजा शेख, रईस शेख, मुजम्मिल शेख, प्रा.आन्सर सय्यद, इस्माईल शेख, अन्वर शेख, सत्तारभाई शेख, जावेद सय्यद, डॉ. ए.आर.सी. सय्यद, हारून सय्यद, पिंटू गायकवाड, ईश्वर खिलारी, नंदू पेरणे, अमोल पेरणे, बाळासाहेब आघाव, पत्रकार विनीत धसाळ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या