अहमदनगर/ जावेद शेख : शतवार नमन त्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेब, रणरागिणी झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई,फातिमा शेख,संत मदर तेरेसा यांनी महिलांच्या प्रत्येक गुणांची पारख आणि अनुभव आपणास दिलेलाच आहे. सावित्रीमाई फुले यांची स्त्री शिक्षणासाठीची चळवळ ( आवाज) आणि त्याचे आजपर्यतचे यश आपण बघतच आहोत. कोणत्याही क्षेत्रात मागे नसलेली स्त्री जगण्याचे सर्व समान हक्क प्राप्त करुन घेत एकूणच स्त्री आज सुरक्षित झालीय. २०११ च्या सेन्सेक्स नुसार ६३% स्त्रीया शिक्षित आहेत आणि ८५% पुरूष सुशिक्षित आहेत. इथे शिक्षित आणि सुशिक्षित या दोन शब्दांमधील फरक तुम्हाला कळेल. मुली (स्त्री) शिकली-शिक्षित झाली ती सर्वकाही कुशलतेने सांभाळतेे. प्रत्येक माणुस जगताना त्याच्या आयुष्यात चढ -उतार हे येत असतात. त्याचप्रमाणे ती कुशलता दाखवतेय मग ती शिक्षित - सुशिक्षित का नाही. इथे मी माझे विचार मांडते, जर माझ्या वर्गातील रोहिणी सांगते की आई बोलते बारावीची परीक्षा नाही द्यायची, कारण विचारले तर सांगते घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. इथे जर आई बोलली चल मी येते तुझ्या सोबत आपण विनंती करू की आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आम्ही फी भरू शकणार नाही, पण तु परिक्षा दे. अभ्यास कर, स्वत:च्या मुलीचे वर्ष वाया जाईल, तिचे आयुष्य आपण घडवायला पाहिजे हा जबाबदारीचा विचार जेव्हा एक आई करेल तेव्हाच स्त्री सुशिक्षित झालीय असे म्हणावे लागेल.
जेव्हा आई सुशिक्षित होईल तिच तिची पुढील पिढी घडवू शकेल, आपणास माहिती आहे इथे सुशिक्षित या शिक्षित या शब्दास शाळेत जाऊन लिहिणे, वाचणे आणि शिकणे परंतु सुशिक्षित या सु - या अक्षरात खुप काही दडलेलं आहे. सू - जेव्हा तु सहनशील होशील, आधुनिक स्त्रियांसाठी सरकारने त्यांच्या फायद्यासाठी अनेक कायदे काढलेले आहेत. काही कायदे स्त्रियांच्या हक्कासाठी होते त्यांचा अनेकांना त्रास झालाच अनेक स्त्रियां ते आपल्या फायद्यासाठी नाही पण नुकसानीसाठीही वापरलेले आहेत. अनेक पुरुषांचे नुकसान झाले त्यामुळे अनेक बालके पोरके झालेले, आपण बघितले आहे. पुढील उदाहरण तुम्हाला पटते का बघा, नवरा बायको दोन मुले, मुले लहान असताना कुरबूर होते, भांडण होते, कोर्ट सोडचिट्टी, पोटगी, नोकरी सर्व मिळुन दुसरा संसार थाटते, यात मुलांचे नुकसान होते. बालपण, भीती, परिणामी ते आत्मविश्वास गमावतात. तीच मुलगी मोठी होऊन आई होते तेव्हा ती कशी असेल हे तिच्या आईने विचार करूनच निर्णय घ्यावेत.
सू - तु शिकलीस मोठ्या हुद्यावर आहे, पण बघा मी विचारते या प्रश्नाचे उत्तर तुम्हास तिच्यापेक्षा कमी हुद्यावर पण तीनेच निवडलेली तीच्यापेक्षा हुशार स्त्रीचे ती एखाद्या मिटींगमध्ये किती ऐकते ?, हुशार स्त्रीला तिच्याकडुन डावलले जात आहे, येथे तिला तिचा स्वाभिमान दिसतो,बघा तुम्ही आहात इथे तुमच्या घरातील काम करणारी बाई ते तुमच्या ऑफिसची शिपाई,मावशी इथपर्यंत त्यांना कसे वागवतात त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने माणुसकीने वागता का ? इथे हा सु - येतो तरच तुम्ही सुशिक्षित सु -तुम्ही अगदी मोठया हुद्यावर आहात परंतु तुम्ही फक्त तुमच्या मुलांना पैसे उडविणे अशा सवयी लावल्या आहेत,मी कमवते हीचे काय जाते असा उल्लेख असेल तर इथे हा सु - येतोच जर तुम्ही इतके कमवता तर एखादया स्त्रीचे शिक्षण करा,तिला शिक्षित करून तिला तिच्या पायावर उभे करा,आपल्या कामाचा चांगला उपयोग करा,सु - हे जास्त नोकरीच्या ठिकाणी एक स्त्री, दुसरी स्त्री दोघींचे शिक्षण समान, कामाचे ठिकाण खाजगी मग इथे त्यात कारण युध्दतेचे असते कोण ? कोण - कोणाची नोकरी घालवते ? इथे सु - विचार कर माझ्या सारखी ती आहे,कदाचित माझ्यापेक्षा तीचे दुःख जास्त असेल, ती तिच्या घरातील मुख्य उपजिवीकेचे साधन असेल, हा विचार केला तर तुझ्या माझ्यातला फरक समजतो, आपल्याला पतीचा आधार आहे आर्थिक मानसिक परंतु हिला कोण ? हा विचार जर तिने केला तर ती सुशिक्षित ख-या अर्थाने आजच्या स्त्रीने रणरागिनी, बलाढय, सदगुणी, सुविचारी, एक निश्चयी, चिकाटी, आईचा शिवबा, बहिणीचा ज्ञानोबा, सखीचा शाम, सीतेचा राम बनवण्याची ताकत योग्य मार्गाने अवलंबली तरच उद्याची स्त्री आत्मनिर्भर बनेल, आईने मुलीचे व्हावे, मुलीने आईचे व्हावे, आपली मुलगी आजची बालिका उद्याची सुज्ञान स्त्री कशी उभी करु, असा प्रयत्न करावा, 100% सुशिक्षितेची पावती मिळेल व जागतिक मुल्यांकनात भारत अग्रेसर होईल हे मात्र नक्की.
- प्रा. सुनंदा साळवे
सुषमा पाटील उच्च माध्यमिक विभाग,
नवी मुंबई (कामोठे) मोबा. 9082570431
0 टिप्पण्या