हरिगाव येथे झावळ्याचा सण उत्साहात

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : येशू ख्रिस्ताच्या जेरुसलेमामध्ये सर्व यहुदी लोकांनी झावळ्या हातात घेऊन त्याचा जयजयकार करून हा खऱ्या अर्थाने विश्वाचा राजा आहे त्याचा जयजयकार करा, उल्हास करा. या उदात्त हेतूने येशू ख्रिस्ताचे नाचत गाजत सर्वांनी स्वागत केले. या आजच्या दिवशी आपण एकच गोष्ट शिकायला हवी की आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खऱ्या अर्थाने आपण उंचावले पाहिजे, स्वागत केले पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे, त्या व्यक्तीच्या जीवनात असलेल्या कलागुणांचे कौतुक केले पाहिजे, हाच आजच्या सणांचा महत्वाचा उद्देश आहे. असे प्रतिपादन संत तेरेजा चर्च हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी झावळ्याचा सणानिमित्त केले.

याप्रसंगी फा. डॉमनिक, रिचर्ड, मुन्तोडे आदी श्बह्गी होते. सकाळी हरीगावातून चर्चपर्यंत भव्य अशी त्याप्रीत्यर्थ मिरवणूक काढण्यात आली. १० एप्रिल ते १७ एप्रिल पर्यंत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि १४ एप्रिल गुरुवारी आज्ञा गुरुवार पवित्र संगीत मिस्सा व साक्रामेंतासमोर भक्ती, सायंकाळी ७, ८, ९, १०, ११ वाजता विविध ठिकाणी दि १५ एप्रिल रोजी उत्तम शुक्रवार रोजी सकाळी ७ वा. क्रुसाच्या वाटेची भक्ती, सात शब्दावर प्रवचन, सायंकाळी ५ वाजता प्रभूच्या दुं:ख सहवासाचा विधी आदी दि १६ सकाळी ७ वा. दु:खी मातेची भक्ती, रात्री १०.३० वा. पुनरुत्थान जागरण विधी, रविवार दि.१७ एप्रिल इस्टर सण साजरा करण्यात येणार असून सकाळी ७ वा.प्रभूचा पुनरुत्थान सोहळा, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रे फा. ज्यो गायकवाड श्रीरामपूर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या