वाळुज महानगर : अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या मराठवाडा संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक विलास अंभोरे यांची निवड करण्यात आली. क्रांती सेनेचे प्रदेश सरचिटणीस भाई नितीन देशमुख यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांना विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय क्रांतिसेनेचे संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे, वाळूज महानगर प्रमुख दिनेश दुधाट, वाळूज महानगर युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर, जिल्हा संघटक राजू शेरे पाटील, वाळूज महानगर उपाध्यक्ष दीपक गायकवाड, वाळूज महानगर युवा सचिव गजानन खाडे, वाळूज महानगर युवा संघटक अमोल साळुंके, विक्रम आळंजकर, गणेश अंभोरे पाटील, अक्षय गाडेकर, राहुल मार्कंडे, राहुल काळे, शरद कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विलास अंभोरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे माजी महसूलमंत्री डॉ शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, सरचिटणीस भाई नितीन देशमुख, संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, राजीव पवनकर, प्रतापसिंह पाटील, संभाजीनगर संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे पाटील, तालुका प्रमुख लक्ष्मण शेलार आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या