कोरोनाचा काळ इतके लवकर कसे विसरलो ?
अन् माणूसकी सोडून जाती-धर्मावर घसरलो !!
अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर तालूक्यातील बेलापूर याठिकाणी उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संदिप मिटके म्हणाले की, मागील कोरोनाचा कार्यकाळ आपण सर्व जण लवकरच विसरलो अन धर्म भोंगा मंदिर मस्जिद या विषयावर भांडू लागलो. आपला मनुष्य जातीचा मूळ गुणधर्म मानवता आहे हे आपण विसरत चाललो असल्याची खंत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या शांतता समीतीच्या बैठकीत व्यक्त केली.
बेलापुर येथे शांतता समीतीची बैठक बोलविण्यात आली होती त्या वेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके म्हणाले की समाजात सोळा सतरा धर्म आहेत. हे सर्व धर्म मानवतेचीच शिकवण देतात. कुठलाही धर्म दुसऱ्या धर्मासाठी मारक नाही हे सत्य असताना काही असामाजिक तत्व अफवा पसरवुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्याकरीता आपण जागृक राहीले पाहीजे असे काही आढळल्यास आमच्या निदर्शनास आणून द्या. त्यांचा तात्काळ बंदोबस्त करु. बेलापुर गावाची लोकसंख्या मोठी असली तरी सर्व नागरीक जागृक असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमीच आहे. बेलापुर गावाचे नाव कुठेही संवेदनशील म्हणून नोंदले गेलेले नाही. काही स्वार्थी लोक आपली पोळी भाजुन घेण्यासाठी एखादा विषय सतत पेटता ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा बंदोबस्त केला जाईल. व्हाटस्अप वर चुकीची पोस्ट टाकणारावर कठोर कारवाई केली जाईल. विना पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढण्याची परंपरा गावाने चालू ठेवुन एक नवा पायंडा सुरु करावा असे अवाहनही मिटके यांनी केले.
पोलीस निरीक्षक संजया सानप यांनी गावातील प्रमुखांची कमीटी स्थापन करण्याची सूचना केली. या वेळी सर्व ग्रामस्थांनी गावाचा विषय गाव पातळीवरच मिटविण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मुथा यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य शरद नवले, पंचायत समीती सदस्य अरुण पा. नाईक, पञकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, सचिव देविदास देसाई, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, माजी सरपंच भरत साळुंके, अकबर टीन मेकरवाले, हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले. पोलिस काॕन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांनी आभार मानले.
या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, अशोक पवार, अशोक गवते, अजयभाऊ डाकले, बाळासाहेब दाणी, आलम शेख, व्यापारी असोसिएशनचे प्रशांत लढ्ढा, पञकार दिलिप दायमा, किशोर कदम, शफीक आतार तसेच पोलिस हेड काॕन्स्टेबल अतुल लोटके, पोलिस काॕन्स्टेबल भिंगारदिवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या