कोल्हार येथे मंगळवारी ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान मेळावा

राहुरी / बाळकृष्ण भोसले - सद्गुरु परमपूज्य मोरेदादा जन्मशताब्दी वर्ष २०२२ निमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर (नाशिक) व श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र, कोल्हार (ता. राहाता) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी दहा वाजता श्री भगवती माता मंदिरात ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने होणाऱ्या या मेळाव्यात गुरुपुत्र आदरणीय श्री. नितीनभाऊ मोरे यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानिमित्ताने श्री भगवती माता मंदिरमध्ये सलग चार दिवस आयोजित केलेल्या सामूहिक श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठवाचन सेवेत ८१० भाविकांनी सहभाग घेतला.

ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानात गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, बालसंस्कार, युवासंस्कार, विवाह संस्कार, प्रश्नोत्तरे, आरोग्य व आयुर्वेद, भारतीय कृषीशास्त्र, भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता, कायदेविषयक सल्लागार, वास्तूशास्त्र, प्रशिक्षण शिबिरे, पर्यावरण प्रकृती, पशु व गोवंश, माहिती तंत्रज्ञान, प्रशासकीय, याज्ञिकी, स्वयंरोजगार, देश विदेश इत्यादी अठरा विभागांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. सर्व भाविकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कोल्हार येथील स्वामी सेवेकर्‍यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या