इंजि.आशिष कानवडे यांचा ३१ वा वाढदिवस स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था रायतेवाडी येथे साजरा

संगमनेर / प्रतिनिधी : येथील स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था रायतेवाडी येथे आज रविवार दि. १७ एप्रिल रोजी छावा क्रांतिवीर सेना जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी येथील बालाश्रमातील मुलांना भेट देऊन शालेय साहित्य, फळे, खाऊ देण्यात आला.

इंजि आशिष कानवडे यांचा वाढदिवस साईबाबा हॉल मध्ये साजरा केला. यावेळी साई प्रतिमेस आशिष कानवडे यांनी पुष्पहार घालुन वाढदिवस साजरा करत मुलांना शालेय उपयोगी वस्तु, फळे, खाऊ देऊन साजरा करण्यात आला. संतोष पवार व त्यांचे मित्र यांनी या संस्थेची स्थापना सन १९९९ मध्ये केली. तेंव्हापासून आजतागायत स्वयंपप्ररित संस्था एडस् बाधित मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण व योग्य संस्कार करत आहे. तसेच स्वयंप्रेरित संस्थेने निराधार वृद्धांना देखील मदतीचा हात देऊन आधार दिला आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नामदेव राहाणे, संस्थापक संतोष पवार, तसेच कृष्णा डेअरीचे चेअरमन रामनाथ कानवडे, जि. प.प्रा.शाळा व्यवस्थापन कमिटी निमगाव बु अध्यक्ष सचिन कानवडे, जादुगार के भागवत, अल्पसंख्याक युवक काँग्रेस सरचिटणीस अमीन शेख, दारू बंदी कमिटी अध्यक्ष निमगाव बु राहुल कानवडे, गणेश फरगडे, नितीन कानवडे, छावा क्रांतिवीर सेना तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, छावा कामगार युनियन तालुकाध्यक्ष संदीप राऊत, सतीश गोपाळे, तान्हाजी कानवडे, छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्टार एन्टरप्रायजेस चे सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या