कॉलेज कट्टा: भाग 33

एकदा मी मुंबई वरून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने प्लॅनिंग कमिशनच्या सब कमिटी मीटिंगसाठी चाललो होतो. कमिटी अर्थातच युथ अफेअरस आणि स्पोर्टस मिनिस्टरीची होती.

विमान उड्डानापूर्वी एअर होस्टेस ने सर्व सोपस्कार पूर्ण केले... माझ्यासमोरच एक हवाई सुंदरी होती बेल्ट लावण्याचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर, तिने मला वाकून नमस्कार केला. सगळे विमान अर्थात विमानातले लोक माझ्याकडे बघायला लागले. मला नक्की काय चाललेय हे कळेना? ती एवढीच म्हणाली की, सर मी घोडेगाव तालुक्यातली विद्यार्थिनी. तुम्ही जो सोफ्ट स्किल्स चा स्पेशल ड्राईव्ह घेतला होता त्यातून एअर इंडिया मध्ये मला ही नोकरी मिळाली. थँक्स. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती आजचा कट्टा आहे तो सॉफ्ट स्किल चा कट्टा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी पहिल्यांदा सॉफ्ट स्किल चा जंगी कार्यक्रम आखला होता. त्या काळामध्ये विद्यापीठाचा हा एक फ्लॅग शिप कार्यक्रम होता.

प्रा. विकास कदम आणि डॉ. सचिन सुर्वे हे दोघं याचे प्रमुख होते. प्रत्येक महाविद्यालयातल्या एकेका प्राध्यापकाला सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देण्यात आले होते. आणि त्यांनी आपापल्या महाविद्यालयातून 50_ 50 विद्यार्थ्यांना एकत्र करून सॉफ्ट स्किल ट्रेनिंग द्यायचे होते. त्या काळात हे इतके पॉप्युलर झालं होतं. ते आजही आहे. खरं तर महाविद्यालयांमध्ये ही पोरं ही वेगळ्या धाटणीची दिसायची, दिसतात कारण दहा दिवसात ईतकी तयार व्हायची किंवा होतात मुळात सॉफ्ट स्किल अर्थात मृदू कौशल्य यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. आणि यातून व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी या सर्व गोष्टींचा फायदा होतो. या कट्ट्यात काम करणाऱ्या मुलांचे आयुष्य खूप सुंदर होतं. दरवर्षी पन्नास-साठ मुलं काही ठिकाणी दीडशे-दोनशे मुलं महाविद्यालयांमधून या मृदू कौशल्य मधून तयार होतात आणि जी मन लावून करतात त्यांना अनेक ठिकाणी विशेषतः मुलाखतीच्या वेळेस एकूणातच जगण्यासाठी याचा खूप फायदा होतो. या मुलांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो असा अनुभव आहे...

या मृदू कौशल्य कार्यशाळेत ढोबळमानाने खालील विषयांवर चर्चा होतात दहा दिवस दहा वेगळे उपक्रम शिकवले जातात.
आयुष्याचा गोल काय असावा? ध्येयनिश्चिती. आपल्याला आयुष्यात काय व्हायचंय हेच शिकवण्यासाठी ध्येयनिश्चिती अत्यंत महत्त्वाची असते.

Communication skill ( संभाषण कौशल्य )
एकमेकांशी संवाद कसा साधावा? संभाषणाचे काय फायदे होतात? मुळात बोलण्याची काय फायदे होतात... हे यामध्ये शिकवले जातात.

Interview skill ( मुलाखत कौशल्य )
आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो. खरं तर मुलाखत असते परंतु प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी एटिकेट्स काय असावेत? काय बोलायचं? आणि काय बोलायचं नाही? कुठे काय बोलायचे ! शब्द फेक कशी करायची? शब्द उच्चार कसे करायचे? एकूणच आपली मुलाखत आपण कशी चालवायची? हे यामध्ये सांगितलं जातं.

Group discussion ( समूह चर्चा )
समूहामध्ये राहताना आपल्याला समूहांमध्ये चर्चा करावी लागते आणि म्हणूनच मुलाखतींचा आधी बऱ्याच वेळा समूह चर्चेमध्ये भाग घ्यावा लागतो. वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला आपली मते मांडावी लागतात. ती कधी पॉझिटिव्ह तर कधी निगेटिव्ह असतात आणि म्हणूनच समूह चर्चेचा हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो.

Time management ( वेळे चे व्यवस्थापण ) आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असेल तर वेळेला. वेळा पाळणं हे अत्यंत महत्वाचं. पी टी उषा पासून किंवा मिल्खासिंग पासून सगळ्यांनाच त्या सेकंदाचे महत्व किंवा काही मिनिटात लोकल चुकल्यानंतर झालेले नुकसान एखादा तास चुकल्यानंतर आपलं परीक्षा मध्ये झालेले नुकसान हे पाहताना आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. टाईम मॅनेजमेंट जमलच पाहिजे. कमी वेळात जास्तीत जास्त कामाचा उरक असणं म्हणजे टाईम मॅनेजमेंट.

Leadership qualities- नेतृत्व गुण विकास
आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असेल तर निर्णय घेण्याला. निर्णय क्षमता असली, की नेतृत्व गुण विकसित होतात. नेतृत्व करणं उपजत नसतं, तर ते प्रयत्नांनी साकारता येत. चालता चालता पटकन निर्णय घेणं महत्त्वाचं. गटाचे नेतृत्व करणं महत्त्वाचं म्हणून, नेतृत्वगुणांना अत्यंत महत्त्व प्राप्त होतं.

Stress ( ताण तणाव व्यवस्थापन )
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ताण-तणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. पण यात तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं? हे जर कळलं नाही, तर मात्र त्रांगडं होऊन बसत आणि म्हणूनच आपल्याला ताण तणाव व्यवस्थापन शिकता आले पाहिजे. राग व्यक्त करणं म्हणजे व्यवस्थापन नव्हे ! तरी या रागाला मागे टाकण्यासाठी किंवा ताण मुक्त होण्यासाठी वेगळी ऍक्टिव्हिटी करणार. कामात बदल हा रागावर नियंत्रण करण्याचा मोठा भाग असू शकतो आणि म्हणून काम ताणतणावाचे व्यवस्थापन करता आल पाहिजे.

Change ( बदल )
बदल हा आयुष्यातला स्थायीभाव असतो. आणि म्हणून बदल स्वीकारता आल पाहिजे. पदोपदी बदल असतातच change is the only constant thing in life बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की जीच्यामध्ये सातत्य असते. ती सातत्याने होत असते आणि म्हणून बदल स्वीकारता आला पाहिजे. नवीन गोष्टी अंगीकारता आल्या पाहिजेत. त्यामुळे चिडचिड होता कामा नये.

Adjustment ( समायोजन )
कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खुप अडून बसतो. पण तीचे समायोजन केले, जरा ऍडजेस्ट केलं तर काही बिघडत नाही म्हणून ॲडजस्टमेंट इज लाईफ आयुष्यात समायोजन करणे, करता येने फार महत्त्वाचे ठरतात. छोट्या छोट्या गोष्टीत ऍडजेस्ट करता आले पाहिजे. भाजीला मीठ नसलं तर काही बिघडत नाही किंवा जास्त मिठ झालं तरी फारसे बिघडत नाही. ऍडजेस्ट करत राहायचं. चिडचिड करायची नाही. सगळं आपल्याच मनासारखं कसं होईल? रागवायचं नाही. घेतला वसा टाकायचा नाही.

Flexibility ( लवचिकता )
आयुष्यात फ्लेक्झिबल असं याला खूप महत्त्व असतं. खूप रिजिड असण्याचे खूप तोटे होतात व राग वाढतो. चिडचिड वाढते. त्या ऐवजी थोडं लवचिक असावे लागते. शरीर जसे लवचिक असावे म्हणतात तसं मन लवचिक लागत. ताटात डाव्या बाजूला मीठ त्याच्या शेजारी लिंबू नाही ठेवलं फार काही बिघडत नाही पोटातच जाणार ना थोडा थोडा थोडं चंचल राहिलं तर थोडी ॲडजस्टमेंट केली तर...

Positivity ( सकारात्मकता )
आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते सकारात्मकतेला.. प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने घ्यायची. कितीही वाईट घटना घडली, परिस्थिती कितीही कठीण असली किंवा सिच्युएशन असली तरीसुद्धा सकारात्मक विचारांनी ऋणात्मक विचारांवर मात करता येते. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा.

Goal setting ( उद्दिष्ट पूर्ती )
मला आयुष्यात काय व्हायचे आहे हे ठरलं की त्या दृष्टीने पावले उचलता येतात उदाहरणादाखल मला जर कलेक्टर व्हायचं असेल तर नांगरे पाटील साहेब म्हणतात त्याप्रमाणे किमान सात-आठ तास हार्ड वर्क तर करायचं पण स्मार्ट वर्क करत काम करायचं. कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायच्या. वाक्य वाक्य वाचायची. नुसता गोल सेट करून चालत नाही त्या दिशेने पावले उचलावी लागतात व्हिजन आणि मिशन याचा ताळमेळ झाला की गोल अचीव झालाच म्हणून समजा.

Team work ( संघ भावना )
आपण भारतीय लोक एकटे एकटे खूप सुरेख काम करतो पण संघ भावनेने काम करताना आपण खूप मागे पडतो. आणि म्हणून संघ भावनेने काम करता आले पाहिजे. प्रत्येक गोष्ट मीच केली पाहिजे ती मलाच जमेल दुसऱ्या कोणाला जमणारच नाही असं न म्हणता कामाचं ठराविक वाटप केलं तर यश संघाचे म्हणून मानलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सांघिकता असली तरी यशाला किंमत वाढते आणि म्हणून संघ भावनेने काम केले पाहिजे.

Risk management ( धोकेना सामोरे जाणे )
आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना धोके पत्करावे लागतात आणि म्हणून धोक्यांना सामोरे जावं लागतं आता कसं होणार काय होणार या विवंचनेत राहिलं तर काम कधीच होणार नाही म्हणून आयुष्यात धोके पत्करावे लागतात घ्यावीच लागते कॅलक्युलेटेड रिस्क घेणं कधीही चांगलं.

मित्रहो मृदू कौशल्यामध्ये फक्त दहाच स्किल आहेत अशातला भाग नाही. यामध्ये अनेक स्किल वेगवेगळ्या पद्धतीने देता येतात. ती सर्व मी आत्ता इथे सांगत नाही. आपण आयुष्य महाविद्यालयीन जीवनामध्ये कधी ना कधी दहा दिवसांचे हे सॉफ्ट स्किल प्रोग्रॅम्स केलेच पाहिजेत. वेगवेगळ्या माध्यमातून करता येतात. कधीही महिंद्रा अँड महिंद्राच्या ट्रेनिंग मधून टाटा समूहाच्या ट्रेनिंग मधून कधी साफ स्किल डेव्हलपमेंट मधून कधी सहकार्याच्या भावनेतून केलेल्या प्रशिक्षणातून यासाठी वेगवेगळ्या संस्था कंपन्या या काम करतात. आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सॉफ्ट स्किल प्रोग्रॅम मध्ये सहभागी होऊयात चला तर मृदू कौशल्यांचा वापर करूयात...

ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या