श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) - सुदर्शन विद्या निकेतन व तत्वदर्शी फौंडेशन तर्फे, अनंत गायत्री आश्रम, लोहारे येथे दि. 2 मे 22 ते 31 मे 22 या दरम्यान 30 दिवसाचे निवासी स्मरणशक्ती योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सहजतेने अभ्यास कसा करावा, अभ्यास कायमस्वरूपी स्मरणात कसे ठेवावे यांचे प्रशिक्षण या शिबिरात दिले जाते व भारतीय संस्कृती, संस्कार या द्वारे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी योग साधना, ध्यान, योगनिद्रा, प्राणायाम, व्यक्तीमत्व विकासासाठी संत्संग, खेळ, ट्रेकिंग इ. अनेक उपक्रम या शिबिरात राबविले जातात. आपल्या ऋषीमुनींनी दिलेले हे एक अनमोल तंत्रज्ञान आहे, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र उत्तम राजगुडे, श्री सुमित स्वामीजी यांनी दिली आहे.
गुरुकुल शिक्षणपद्धती हाच जीवनाचा पाया रचते. शिक्षण म्हणजे अशी विद्या ज्या द्वारे व्यक्ती पुर्णत्व अनुभव करते. परा (आत्मविद्या) व अपरा विद्या (64 कला इ.), व्यावहारिक विद्या या दोन्ही माहिती असल्यास जिवनाचा समतोल साधला जातो. शिक्षण हे तणावातून बाहेर काढते, परंतु सध्या आपण आत्मविद्या विसरलो आहोत. सुशिक्षित व्यक्ती आनंदाने जिवन जगतो, प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करतो. सुशिक्षित व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत मनाचा समतोल ढळू देत नाही व हसत परिस्थितीतीस सामोरे जातो. समाधान, शांतता, निर्भयता हे संत्संगाद्वारेच प्राप्त होऊ शकते, हे ज्ञान व विज्ञान बालवयातच मुलांना दिले गेले पाहिजे, तरच भारतीय संस्कृती चा पाया रचला जाईल, यासाठी सुदर्शन विद्या निकेतन ट्रस्ट व तत्वदर्शी फौंडेशन टिम, तत्वदर्शी योग शिबिराद्वारे कार्य करत आहे.
आपल्या मुलांची एकाग्रता कमी आहे का?
मुलांची धारणा शक्ती व स्मरणशक्ती वाढली पाहीजे असे तुम्हाला वाटते का?
मुले मोबाईल, काॅमप्युटरवर खेळणे किंवा टिव्ही पाहणे.. या मुळे अभ्यासात दुर्लक्ष होत आहे का? तर आपल्या सर्व प्रश्नांचे समाधान या शिबिराच्या द्वारे होणार आहे. या शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये
शिकलेले कायमस्वरूपी लक्षात राहते व एकाग्रता वाढते.
फक्त 30 दिवसात संपूर्ण विज्ञान, गणित, भुगोल विषयांचा अभ्यास पूर्ण करतात.
(SMART Study Technique) स्मार्ट अभ्यास तंत्राद्वारे वाचण्याची गति वाढते व आकलन शक्ती व स्मरणशक्ती वाढते.
कमी वेळात संपूर्ण विषयाची उजळणी करता येते.
विद्यार्थ्यांना स्वयंशासन व स्वयंशिस्त लागते.
हेच अभ्यास तंत्र स्पर्धा परीक्षा, UPSC MPSC, CET, SAT, GRE इ. अनेक परीक्षांसाठी खुप उपयोगी.
जुन 2022 ला इयत्ता 8, 9, 10 वी घ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...
अभ्यासक्रम:-CBSE, State Board, IB, ICSE...
भाषा माध्यम:- मराठी, English
ऑनलाइन योगसाधना रोज सकाळी 5:30 ते 7:00 am, आसन, योगनिद्रा इ...फ्री राहील ...30 दिवसाच्या शिबिरानंतर, शिकलेले 100% स्मरणात राहण्यासाठी पुढील तीन महिने रोज 20 मिनिट online follow up घेतला जाईल. जेणेकरून शिकलेले अभ्यास तंत्र... चांगल्या प्रकारे वापरू शकतात. सकाळी online योगसाधना झाल्यावर followup घेतला जाईल. या शिबिरात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मागील वर्गात 65-70% गुण आवश्यक... व आँनलाईन प्रवेश परिक्षा घेतली जाईल, पात्र विद्यार्थ्यांना च प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमाची प्रस्ताविक ओळख किंवा प्रस्तावना दि. 5 एप्रिल 2022 रोजी, संध्याकाळी 7:00 वा( Zoom) ॲपवर आँनलाईन होईल. झुम लिंक साठी आजच संपर्क राजगुडे राजेंद्र (बापू)-8208470572, सुमितजी-9511295679, 9011351111, अभिजित आढाव ( श्रीरामपूर), 7020066900 स्नेहल शिरसाठ (कोल्हार), सुमितजी (संगमनेर -राहता) 7517200200, पोपटराव आघाव (राहुरी -नेवासा,) यांचेकडे करावा अधिक माहितीसाठी https://www.tattvadarshiyog.com या संकेतस्थळावर भेट द्यावी व लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या