केशरबाई तनपुरे मल्टीस्टेट व नागरी सहकारी पतसंस्थेला 1 कोटी सात लाख रुपयांचा नफा

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या सौ. केशरबाई तनपुरे मल्टीस्टेट व नागरी सहकारी पतसंस्थेला 2021- 22 या आर्थिक वर्षात 1 कोटी सात लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर कैलास तनपुरे यांनी दिली.

स्वर्गीय कैलास दादा तनपुरे यांनी घालून दिलेल्या आदर्श मूल्यांवर संस्था प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करीत असून राहुरी मुख्य शाखेत राहुरी (शनि चौक) राहता, सोनई येथे संस्थेच्या शाखा कार्यरत असून सर्व मिळून संस्थेचे आर्थिक वर्षात 330 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल झालेली आहे. संस्थेच्या पारदर्शक कामामुळे ठेवीदारांची यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. संस्थेकडे एकूण 75 कोटी च्या ठेवी असून सुमारे 50 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. त्यात सोनेतारण कर्ज 18 कोटी आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक 20 कोटी 30 लाख रुपयांची आहे. स्वनिधी एक कोटी 30 लाख आहे. सी डी रेशो 68 टक्के अजून संस्थेची स्वमालकीची इमारत आहे. संस्थेचे स्वतः Strong रूम लॉकर सुविधा विनामूल्य  आहे. sms सुविधा, मोबाईल ॲप, नेट बँकिंग, RTGS, NEFT या सुविधा आहेत.

संस्थेच्या या यशामध्ये चेअरमन बजरंग गंगाधर तनपुरे, सदाशिव निवृत्ती सरोदे, ज्ञानदेव श्रीपती वराळे, रावसाहेब तनपुरे (राऊकाका) यासह सर्व संचालक, शाखांचे शाखा अधिकारी, कर्मचारी, कलेक्शन एजंट यांचा समावेश व सहकार्य असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मा.नगरसेवक सागर तनपुरे यांनी सांगितले आहे. तर संस्थेच्या मॅनेजर सौ. कांचन बाळाजी पानसंबळ यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या