बीड नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांची विभागीय चौकशी - नगरविकास राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर/ जावेद शेख : नगरपालिकेतील अनियमितते प्रकरणी बीड नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांची विभागीय चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तर सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी बीड नगरपालिकेच्या चार कर्मचा-यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. तनपुरे बोलत होते. बीड नगरपालिकेतील अनियमिततेप्रकरणी बीड नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. सभागृहात ब्रीफिंगसाठी अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहणे गरजेचे असते. मात्र, बीड नगरपरिषदेचे चार कर्मचारी हे आज लक्षवेधीला सभागृहात उपस्थित नव्हते. हा सभागृहाचा अवमान असल्याचे स्पष्ट करीत चारही कर्मचा-यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे श्री. तनपुरे म्हणाले. 

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर यांनी भाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या