अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी म्हसे

राहुरी/ मधुकर म्हसे : अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील शरद म्हसे यांची नुकतीच निवड करण्यात आली. असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष दत्ता मारोती खराटे यांनी यासंदर्भात नुकतेच नियुक्ती पत्र श्री. म्हसे यांना दिले आहे.

जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर श्री. म्हसे यांनी सांगितले की, संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या तळागळातील विद्यार्थी व फार्मासिस्ट पर्यंत पोहचण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांचे व फार्मासिस्ट यांचे प्रश्न सोडवण्याठी व संघटनेचे विविध उपक्रम राबविण्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर राहील.

असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन गुलदगड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. म्हसे यांचे अभिनंदन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या