विहामांडव्यात भाजपाचे कृषी पंपाच्या विज तोडणी विरोधात आंदोलन


◾भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांच्या प्रयत्नांना यश तोडणी थांबवण्याचे आश्वासन

पाचोड/विजय चिडे : पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील कृषीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांनी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास विहामांडवा येथील महावितरण कार्यालयाच्या विरोधात आंदोलन केले.

या वर्षी अतिवृष्टी मुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाच्या वतीने देण्यात आलेली नुकसान भरपाई ही अगदी तुटपुंज्या स्वरुपाची असल्याने व त्याच प्रमाणे विहामांडवा परिसरात ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा अर्ध्याहून ऊस अद्यापही शेतात उभा आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, बाजरी, सोयाबीन या पिकांची कापनी बाकी असताना महावितरण कार्यालय मार्फत कृषी पंपाची वीज तोडली गेली होती. सध्या शेतकरी वीज बिल भरण्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे , त्यांना वीज बिल भरण्यासाठी वाढीव मुदत मिळावी. खंडित केलेला वीज पुरवठा सुरु करावा व दिवसाची विज मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली विहामांडवा येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढुन हे आंदोलन करण्यात आले. यासाठी शेकडो शेतकरी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आपेगाव महावितरण कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शेतकर्यांनी या अगोदर ही अंदाजे ९ ० लक्ष रुपये इतके वीज बिल भरना केला गेला आहे. त्यामुळे वीज बिलाची सक्ती न करता तात्काळ वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे आश्वासन महाविरण पैठण विभागाचे उपकार्यकारी अभियंता कल्याण रंधे यांनी दिला.

यावेळी राजेंद्र गाभूड, प्रल्हाद एखंडे, राजेंद्र पन्हाळकर, शिवाजी बोडखे, बाळासाहेब शिंदे, विलास संत, संपत करताडे,भाईजी सकलेचा, राजेंद्र गाभूड,राजेंद्र पन्हाळकर, शिवाजी बोडखे, प्रल्हाद एखंडे, भाऊसाहेब डुकरे, दीपक डुकरे, विक्रम डुकरे, भागवत डुकरे, कृष्णा गावंडे, विशाल डुकरे, अनिल हकम, परमेश्वर गायकवाड, बाळासाहेब शिंदे, संपत करताडे, रवी गाभुड, सचिन गाभुड, भारत गाभुड यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या