राज्याचे हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चितीसाठी सूचना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अहमदनगर / जावेद शेख - हळद लागवडीपासून प्रक्रिया ते विक्रीपर्यंत शेतकरी व प्रक्रियाकार तसेच निर्यातदारांना अडचणी येतात. हे विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचे हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी आणि शासनाला सल्ला देण्यासाठी हेमंत पाटील, लोकसभा सदस्य, हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीद्वारे राज्यातील हळद पिकाची लागवड प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाय योजनांच्या अनुषंगाने राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण मसुदा तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्‍या सूचनांकरीता सदरहू मसुदा कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंबंधी ग्राहक, शेतकरी, निर्यातदार, उत्पादक, व उद्योजक यांनी आपल्या सूचना phytocel@gmail.com या मेलवर अथवा कृषी उपसंचालक, फलोत्पादन-3, कृषी आयुक्तालय, कृषी भवनजवळ, शिवाजी नगर, पुणे - 411005 या पत्त्यावर 7 मार्च 2022 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठविण्यात याव्यात, असे आवाहन सहसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या