उंबरे शिवारात शनिशिंगणापूर रस्त्यावर भिषण अपघात

राहुरी विद्यापीठ : शिंगणापूर रस्त्यावर राहुरी कडून शनिशिंगणापूर कडे जाणाऱ्या कारने उभ्या असणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षाला जोराची धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये रिक्षा चे अनेक तुकडे झाले असून त्याचे स्पेअर पार्ट रस्त्याच्या बाजूला अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेले आहेत. यामध्ये तीन महिला एक छोटीशी मुलगी व एक पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्व जण गंभीर स्वरूपात जखमी झालेले असून त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी येथे नेण्यात आले. आज सकाळी 11:40 च्या दरम्यान हा अपघात झालेला असून कारचा ड्रायव्हर पसार झालेला आहे. अमजद असे रिक्षा चालकाचे नाव आहे. तो हि जखमी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या