श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : विविध बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्याकडून हजारो ग्राहक आर्थिक अडचणीमुळे हक्काने कर्जाची मागणी करतात. परंतु असे निदर्शनास येते की ग्राहक मोबाईल, मोटारसायकल आदी कारणासाठी बँकाकडून कर्ज काढतात. वेळेवर हप्ते सुद्धा भरले जातात. परंतु जमिनीवर अथवा घरावर कर्ज नसताना घरावर, जमिनीवर ७/१२ वर कोणतेही कर्ज नसताना कर्ज मागणी ग्राहक ज्या वेळी करतात त्यावेळी त्याची अडवणूक करून कर्जास पात्र असताना त्यांची अडवणूक बँका, पतसंस्थेकडून करण्यात येते. अशा आशयाची तक्रार श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन व शिरसगाव येथील युवा नेते गणेशराव मुदगुले यांनी केली आहे.
सिबिल संदर्भात आ. राधाकृष्ण विखे पा हे देखील विधानसभा व राज्य सरकारने याबाबत निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.
बँकेकडून सिबिल स्कोअर चेक करण्यात येतो. बँकेकडून घेतलेले कर्ज हप्ते वेळेवर भरले जात असतील तर स्कोअर चांगला येतो. पण वेळेवर कोणत्याही कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने सिबिल स्कोअर योग्य नसतो. परंतु हप्ते नियमित असताना, सिबिल स्कोर चांगला असताना सुद्धा ग्राहकांची अडवणूक करण्यात येते हे योग्य नाही. त्याची सविस्तर माहिती घेतली जात नाही याची खंत वाटते. काही ग्राहकांना याची माहिती नसते त्यासाठी “पैसा बाजार”हे ॲप घेणे गरजेचे आहे. त्यावर पॅनकार्ड क्र. आदी माहिती भरावी. स्कोअर मिळतो पण हे सर्वसामान्यांना माहित नसते. सिबिल स्कोअर नेहमी बदलत असतो. काही वेळा खराब असतो. पुन्हा चांगला असतो. सिबिल खराब नावाच्या खाली चांगल्या ग्राहकांना बँकेची सुविधा मिळत नाही. यावर काहीतरी उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.
यासाठी सरकारने योग्य निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे. निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन उभे करावे लागेल. आज रोजी बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या ७/१२ वर कोणताही बोजा नसताना सिबिल खराब असल्याने त्यांना कोणतीच बँक कर्ज देत नाही. हा ग्राहकांवर अन्याय आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या सुद्धा निदर्शनास आणणे गरजेचे आहे. खा सुजय विखे पाटील यांनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. सध्या अधिवेशन चालू असल्याने त्यातही आवाज उठविला जाणार असल्याचे गणेशराव मुदगुले यांनी सांगितले.
0 टिप्पण्या