या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राध्यापिका अरुणा दसपुते होत्या. यावेळी महिला दिवसाच्या निमित्ताने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना हा दिवस का साजरा करावा? त्याचे मागचे उद्दिष्टे काय ? हा दिवस साजरा करण्याची गरज का पडली ? हा सर्व सविस्तर इतिहास त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितला. सुरुवातीला स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, अपमानास्पद वागणूक, पुरुषांकडून पिळवणुक होत होती. त्यामुळे सर्वप्रथम पाश्चिमात्य देशांमध्ये १९०८ च्या दरम्यान मोठे जनआंदोलन उभे राहिले. मोठी चळवळ उभारली गेली व स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. हळूहळू ही चळवळ संपूर्ण जगामध्ये पसरली आणि त्यानंतर जागतिक पातळीवर त्याची दखल घेऊन येऊन सर्वप्रथम १९१० रोजी ८ मार्च हा जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येईल असे जाहीर केले. हा संपूर्ण इतिहास दसपुते यांनी आपल्या भाषणात सांगितला.
तसेच विद्यार्थी प्रतिनिधी आशिया शेख हिने देखील आपल्या भाषणात मुली ह्या सक्षम, निडर व स्वावलंबी झाल्या पाहिजे व स्वयम् निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने आज जागतिक महिला दिवस साजरा करत आहोत हे सिद्ध होईल. तसेच अमृता नवले हीन देखील भाषण दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.पी. कोठावळे यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणात इतिहासातील कर्तृत्वान महिला तसेच वर्तमानात स्त्रियांचा गौरवाने त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. आणि त्या पासून आपण बोध घेऊन आपल्या आचरणात उतरले पाहिजे. कोणतेही भाषण फक्त ऐकल्यासारखे न करता त्या मन लावून लक्ष देऊन ऐकल्यानंतर ते आत्मसात करून आपल्या वर्तनात ते आणावे असे आव्हान त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. याप्रसंगी महाविद्यालयात विद्यार्थीनींना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप सातोनकर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. विलास महाजन यांनी केले व आभार ग्रंथालय प्रमुख डॉ.हरीप्रसाद बिडवे यांनी मानले. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ.नलावडे, डॉ.संतोष चव्हाण, डॉ.गांधी, डॉ.जायभाये, प्राध्यापक गावंडे, प्रा.विनोद काबळे, डॉ.विठ्ठल देखने, प्राध्यापक चित्ते, अनिल नरवडे, सतिष वाघ, इंगळे, झि.उमाकांत भोसले, वैभव घायाळ, प्रदीप फोटफोडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या