राहुरी : वंचित बहुजन युवा आघाडीचा कार्यक्रम शिर्डी येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आले होते. त्यांचे आगमन होताच तरुणाईने जल्लोषात स्वागत केले. शिर्डी येथे युवा आघाडीच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सहभागी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. आंबेडकर म्हणाले की, तरूणाई वर माझा प्रचंड विश्वास आहे, तरुणांनी चळवळीचे नेतृत्व करावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी राज्य भरातील युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंजलीताई आंबेडकर, युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, महासचिव राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारिणी चे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव अप्पासाहेब मकासरे, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, प्रतिक बारसे, युवा जिल्हाध्यक्ष संतोष जठार, उत्तर अध्यक्ष पविण आल्हाट, योगेश बोरुडे, गौतम पगारे, दिलीप कदम, पाखरे, महेश साळवे सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका कार्यकारिणी ने विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या