सोमवारी (ता.१४) प्रधान मुख्य वनसंरक्षक जित सिंग पाचोड (ता.पैठण) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक जित सिंग औरंगाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अचानक पैठणच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्राच्या वतीने पाचोड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या मोहगणी वृक्षलागवडीच्या कामाची थेट बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येथील शेतकरी रमेश भूमरे व रामेश्वर हिंगुर्डे यांच्या शेतातील लागवड केलेल्या मोहगणीच्या झाडांची पाहणी करीत त्यांचेसह अन्य शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी सिंग म्हणाले, 'मोहगणी वृक्ष रोजगारा बरोबरच उतपन्नाचे स्रोत असुन शेतकऱ्यांनी केवळ यावर अवलंबुन न राहता इतरही फळ पिकाच्या लागवडीचा विचार करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावयास हवे.' यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे औरंगाबादचे वनसंरक्षक शिवाजी फुले यांनी शेतकऱ्यांना पारंवारिक शेतीपेक्षा वन शेती अधिक फायदेशिर असल्याचे सांगितले. यावेळी विभागीय वनाधिकारी के.के.जमधडे (कोकाटे), सहाय्यक वनसंरक्षक पाखरे, तौर, पैठणचे वनक्षेत्रपाल व्ही. यु. कवडे, वनपाल ए. आर. राऊत, जी.जी. बिरसोने, रोजगार सेवक दत्तात्रय भुमरे, वनमजुर आर्ले यांचेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या